Bicholim Tradition Dainik Gomantak
गोवा

Bicholim Tradition: 3 गावांशी नाते जोडणारा मयेतील ‘नवे उत्सव’ उत्साहात ; भातकापणीच्या कामास प्रारंभ

Bicholim Tradition: हा उत्सव परंपरेप्रमाणे साजरा करण्यात आला. नवे उत्सव साजरा झाल्याने आता शेतकरी भात कापणीच्या कामाला सुरवात करणार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Tradition: डिचोली, शेकडो वर्षांची परंपरा आणि तीन गावांशी संबंधित असलेला मये गावातील ''नवे उत्सव'' रविवारी (ता. २२) परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

मये गावाशी संबंधित असलेल्या डिचोलीसह वायंगिणी गावातही हा उत्सव परंपरेप्रमाणे साजरा करण्यात आला. नवे उत्सव साजरा झाल्याने आता शेतकरी भात कापणीच्या कामाला सुरवात करणार आहेत.

विशेष म्हणजे, नवे उत्सव होत नाही, तोपर्यंत भाताची कापणी करता येत नाही. मये गावातील हा नवे उत्सव तीन गावांशी संबंधित आहे. मये, डिचोली आणि वायंगिणी या तिन्ही गावांचे नवे श्री महामाया देवीच्या प्रांगणात एकत्र केले जाते.

सुरुवातीला मयेचे चौगुले, वायंगिणी आणि डिचोलीच्या श्री शांतादुर्गा देवीचे चौगुले गावकरवाडा येथे असलेल्या ग्रामदेवता श्री महामाया देवीच्या प्रांगणात जमतात.

येथून मग सर्वजण वाजत गाजत श्री नारायण देवाची मळी या पारंपरिक भातशेतीच्या स्थानी येतात. त्यानंतर शेतात विडा वाहून विधिवत पूजा केली जाते. गाऱ्हाणे झाल्यानंतर सर्वजण भात कापणीस सुरुवात करतात.

नंतर कापलेली कणसे माथ्यावर घेऊन सर्व ग्रामस्थ, गावकर आणि चौगुले मानकरी ग्रामदेवतेच्या मंदिरात येतात. मंदिरात आल्यानंतर सर्व कणसे देवीच्या पुढे ठेवून त्यांची विधिवत पूजा केली जाते. नंतर सर्वजण ‘नवे’ अर्थात कापलेली कणसे आपापल्या घरी घेऊन जातात.

या कणसांची पूजा करून घराच्या प्रवेशद्वारावर लावतात आणि थोड्या कणसांची खिचडी करून प्रसाद म्हणून खातात. या उत्सवानंतर खऱ्या अर्थाने भात कापणी आणि मळणीच्या कामाला प्रारंभ होणार आहे.

डिचोलीतही पूजा

डिचोलीतील ग्रामस्थ गावकर चौगुले मंडळींकडून रविवारी मये येथून भाताची कणसे वाजतगाजत गावकरवाडा येथील श्री शांतादुर्गा मंदिरात आणण्यात आली.

त्याठिकाणी पूजा विधी आदी पारंपरिक कार्यक्रमांसह नवे उत्सव साजरा करण्यात आला.

वैशिष्ट्यपूर्ण परंपरा

मये गावात साजरा होणाऱ्या नवे उत्सवाला वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. भातशेती पिकून तयार झाल्यानंतर पहिले कणीस ग्रामदैवत श्री महामाया देवीच्या चरणी अर्पण करण्याचा उत्सव म्हणजेच मये गावातील प्रसिद्ध ‘नवे’ उत्सव.

मये गावातील इतर उत्सवांप्रमाणेच नवे उत्सवालाही एक वेगळे महत्त्व आहे. भातशेती पिकल्यानंतर नवे केल्याशिवाय गावात भात कापणी केली जात नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT