Bicholim रस्त्यांची डागडुजी करण्यात आली असून, बऱ्याच प्रमाणात रस्त्यावरील खड्डयांची समस्या दूर झाली आहे. Dainik Gomantak
गोवा

डिचोली-साखळी रस्ता अखेर खड्डेमुक्त

डिचोलीतील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली असून, बऱ्याच प्रमाणात रस्त्यावरील खड्डयांची समस्या दूर झाली आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: (Bicholim) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्या निर्देशानंतर अखेर डिचोलीतील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली असून, बऱ्याच प्रमाणात रस्त्यावरील खड्डयांची समस्या दूर झाली आहे. डिचोली-साखळी रस्त्यासह अस्नोडा आणि पुलावरील रस्ता खड्डेमुक्त झाला आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीस राज्यात रस्त्यांवरील खड्डयांचा विषय तापला होता. काँग्रेसने तर आंदोलन केले होते. या आंदोलनाची मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गंभीर दखल घेताना 1 नोव्हेंबरपर्यंत रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही. असे जाहीर केले होते. मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्यानंतर दहा-बारा दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे साखळी- डिचोली या मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले होते. साखळी- डिचोली रस्त्यासह डिचोली-दोडामार्ग आदी अंतर्गत रस्त्यांवरील खड्डयांची डागडुजी करण्यात आली आहे.

पुलावरील रस्ते खड्डेमुक्त

साखळीसह अस्नोडा पुलावरील रस्ता अखेर 'खड्डे' मुक्त झाला आहे. दहा-बारा दिवसांपूर्वी या पुलावरील रस्त्याची डागडुजी करताना पुलावरील रस्ता चकाचक केला आहे. आता या पुलावरून वाहतूक करताना वाहनचालकांना खडड्यांशी स्पर्धा करावी लागत नाही, की अन्य कोणती समस्याही निर्माण होत नाही. यामुळे वाहनचालकांत समाधान व्यक्त होत आहे. अस्नोडा पुलावरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. पारकडील बाजूने पुलाला जोडलेल्या रस्त्यावर तर मोठे खड्डे पडून हा रस्ता पूर्णपणे खिळखिळा बनला होता. त्यामुळे पुलावरून वाहतूक करताना वाहनचालकांना कठीण दिव्य पार करावे लागत असे. लहानसहान अपघात तसेच वाहनांच्या सुट्या भागांची मोडतोड होण्याचे प्रकारही वाढले होते. पुलावरील खड्डयांवरुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी गेल्या 2 ऑक्टोबर रोजी अचानक आक्रमक पवित्रा घेत खड्डयांनी झोपून आगळ्यावेगळ्या पद्धतीने सरकारचा निषेध केला होता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT