Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : सर्वत्र ‘मोगरी’च्‍या फुलांचा दरवळ; भावसुद्धा वाढला

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली, मोगरी फुलांचा बहर समाधानकारक आल्याने यंदा शिरगावच्‍या श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवात मोगरीच्‍या फुलांची बंपर आवक झाली. मात्र तरीसुद्धा फुले महागच होती. त्यामुळे संपूर्ण शिरगावात सुवासिक दरवळासह मोगरी फुलांचा भावही वाढला होता.

यंदा जत्रोत्सवाच्या एकाच दिवशी या फुलांच्या विक्रीतून १५ लाखांहून अधिक रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

अनुकूल आणि पोषक हवामानामुळे यंदा सर्वत्र मोगरीच्या फुलांना चांगला बहर आला आहे. त्यामुळे यंदा श्री लईराई देवीच्या जत्रेनिमित्त गेल्या दोन दिवसांपासून शिरगावात मोगरीच्या फुलांची आवक वाढली होती.

आज (रविवारी) तर मोगरीच्‍या फुलांची बंपर आवक झाली. तरीसुद्धा फुले महागच होती. प्रति १०० ते १५० रुपये एक वेणी तर कळ्यांचे पडही भाव खात होते. आज जत्रेच्या दिवशी तर पुरुष आणि महिला मिळून ३०० हून अधिक विक्रेते मोगरीची फुले विकताना दिसून येत होते.

एक कळा २ रुपये :

श्री लईराई देवीला मोगरीचे कळे प्रिय अशी प्रत्येक भक्ताची भावना आहे. आणि म्हणूनच देवीच्या दर्शनासाठी जाणारे प्रत्येक जण मोगरीचे कळे देवीच्या चरणी अर्पण करतो. काही भक्तगण नवस बोलल्यानुसार ठरावीक कळ्यांच्या माळा देवीला अर्पण करतात. जत्रेच्‍या दिवशी धोंड भक्तगणही मोगरीच्या माळा गळ्यात घालतात. जत्रा ते कौलोत्सवपर्यंत शिरगावात मोगरीच्या कळ्यांना प्रचंड मागणी असते.

उलाढाल आणखी वाढण्‍याची शक्‍यता

दरवर्षी जत्रोत्‍सवच्‍या काळात अस्नोडा बसस्थानक ते श्री लईराई देवीच्या मंदिरापर्यंत पावलोपावली मोगरीचे कळे विक्रीस उपलब्ध असतात. गोव्यासह शेजारच्या राज्यांतून मोगरीच्या फुलांची आवक होत असते. जत्रा काळात शिरगावात मोगरीच्या फुलांचा दरवळ पसरत असतो.

यंदाही शिरगावात याची अनुभती येत आहे. मोगरीच्या फुलांना असलेली मागणी पाहता, दरवर्षी जत्रा काळात शिरगावात मोगरी फुलांच्या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. यंदा आवक वाढल्याने कौलोत्सव होईपर्यंत मोगरी फुलांच्या विक्रीतून उलाढालीत वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT