दुर्मिळ पक्षी: जगात हजारो प्रकारचे पक्षी आढळतात. परंतु असे काही आहेत जे अत्यंत दुर्मिळ आहेत. आज (7 सप्टेंबर) आपण फोटोस्टोरीच्या माध्यमातून जगातील 5 दुर्मिळ पक्ष्यांबद्दल जाणून घेणारोत...
काकापो पक्षी: काकापो पक्षी: काकापो हा जगातील सर्वात वजनदार उड्डाणविरहित पक्षी आहे. हा न्यूझीलंडचा मूळ पक्षी असून तो नामशेष होण्याच्या वाटेवर आहे. मोठी हिरवी पिसे असलेला हा पक्षी रात्री सक्रिय असतो. तो फळे आणि बिया खातो.
स्पॅनिश इम्पीरियल ईगल: स्पॅनिश इम्पीरियल ईगल हा एक शक्तिशाली आणि सुंदर पक्षी आहे. तो स्पेन आणि पोर्तुगालमध्ये आढळतो. या पक्ष्याची चोच मोठी असून पंख लांब असतात. शक्तिशाली पंजे असलेला हा पक्षी ससे आणि इतर लहान प्राण्यांची शिकार करतो. हा पक्षी सुद्धा नामशेष होण्याच्या वाटेवर आहे.
जुनिन ग्रेबे: जुनिन ग्रेबे हा पक्षी पेरुच्या जुनिन सरोवरात आढळतो. सरोवराच्या पाण्याच्या पातळीतील बदल आणि प्रदूषणामुळे त्याची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. त्याचा आकार लहान असून त्याचा रंग तपकिरी आहे. त्याची मान लांब असून पाण्यातील कीटक व लहान मासे खातो.
अटलांटिक पफिन: अटलांटिक पफिन हा उत्तर अटलांटिक महासागरात आढळणारा गोंडस समुद्री पक्षी आहे. ओवरफिशिंग आणि हवामान बदलामुळे त्याची संख्या कमी झाली आहे.
ग्रेट इंडियन बस्टर्ड: ग्रेट इंडियन बस्टर्ड हा भारतीय उपखंडात आढळणारा एक मोठा आणि गंभीरपणे धोक्यात असलेला पक्षी आहे. ते 100 सेमी लांब असू शकते आणि त्याचे पंख 210-250 सेमी असू शकतात. त्याचे वजन 15-18 किलो असते. ग्रेट इंडियन बस्टर्ड मुख्यतः राजस्थान आणि गुजरातमध्ये आढळतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.