Gold chain stolen Goa temple Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: नारळ ठेवण्यासाठी वाकल्या अन् सोने लुटले, भक्त बनून आलेल्याने मयेत फुलविक्रेतीला लुटले; अडीच लाखांची माळ लांबविली

Gold chain stolen Goa temple: देवीचे दर्शन घेण्याच्या बहाण्याने मंदिरात आलेल्या एकाने फुलविक्रेत्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ पळविल्याची घटना आज (बुधवारी) मये येथील श्री केळबाय देवीच्या मंदिरात घडली.

Sameer Amunekar

डिचोली : देवीचे दर्शन घेण्याच्या बहाण्याने मंदिरात आलेल्या एकाने फुलविक्रेत्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ पळविल्याची घटना आज (बुधवारी) मये येथील श्री केळबाय देवीच्या मंदिरात घडली. या सोन्याच्या माळेची किंमत अंदाजे २.५ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी डिचोली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. दिवसाढवळ्या मंदिरात घडलेल्या या घटनेमुळे मये परिसरात खळबळ उडाली आहे. या मंदिरात अशी अप्रिय घटना यापूर्वी कधीच घडली नव्हती, अशी माहिती स्थानिक नागेश (बबन) नाईक यांनी दिली.

सीसीटीव्ही बंद

केळबाय देवी मंदिरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था आहे. मात्र हे कॅमेरे बंद केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सोन्याची माळ खेचतानाचा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला नाही. सोन्याची माळ खेचण्यापूर्वी भामट्याने तेथीलच दोन महिलांना गाठून मंदिरासाठी देणगी द्यायची आहे, असे सांगितले होते. मात्र, त्या महिलांनी त्याला प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती समोर आली आहे.

भांबावल्यावर आरडाओरडा केला; पण...

सरस्वती नाईक या केळबाय देवीच्या मंदिरात फुले विकतात. नेहमीप्रमाणे त्या बुधवारीही फुले विकण्यासाठी मंदिरात बसल्या होत्या. मला देवीचे दर्शन घ्यायचे आहे, असे सांगून भामट्याने या महिलेकडून पुष्पहार आणि नारळ विकत घेतला.

नंतर गर्भकुडीजवळ नारळ कसा ठेवायचा, हे सरस्वती हिला विचारले. नारळ ठेवण्यासाठी सरस्वती वाकल्या, त्याचवेळी भामट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ खेचली आणि पळ काढला. अचानक घडलेल्या प्रसंगामुळे सरस्वती भांबावल्या आणि त्यांनी आरडाओरड केली. शेजारील लोक जमेपर्यंत तो चोर गायब झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? सामना रद्द करण्याच्या याचिकेवर Supreme Courtनं दिला 'हा' निर्णय

Kadamba Bus: "दारू पिऊन बस चालवल्यास घरचा रस्ता दाखवणार" KTCचा आक्रमक पवित्रा; तुयेकरांनी दिले कठोर निर्देश

Kanpur Crime: कानपूर हादरलं! 5 रुपयांचे आमिष देऊन 6 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; 13 आणि 8 वर्षाच्या मुलांनी केले कुकृत्य

Plastic Ban: प्लास्टिक बंदीचे वाजले तीनतेरा; पिशव्यांचा होतोय बेधडक वापर, ग्राहक-विक्रेते दोघेही जबाबदार

Abhishek Sharma: पहिल्याच चेंडूवर सिक्स.. अभिषेक शर्माने 'मुंबईचा राजा'च्या कामगिरीची केली बरोबरी, 'या' खास क्लबमध्ये एन्ट्री

SCROLL FOR NEXT