cctv Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : मंदिरे फोडणारी टोळी कार्यरत; पोलिसांचे आवाहन

Appeal to the Police : डिचोली शहरात सध्या मंदिरे फोडण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या ता. २६ जून रोजी एकाच रात्री चोरांनी चार मंदिरांना लक्ष्य केले होते. हा प्रकार बंद झाला आहे, असे वाटले असतानाच बुधवारी (ता. २४ जुलै ) रोजी दोन मंदिरे फोडण्याच्या घटना घडल्या.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली, मंदिरफोड्या रोखण्यासाठी देवस्थान समित्यांनी ''सतर्क'' रहावे. प्रत्येक मंदिरात सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी सूचना पोलिसांनी डिचोलीतील विविध देवस्थान समित्यांना केले आहे.

डिचोली शहरात सध्या मंदिरे फोडण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या ता. २६ जून रोजी एकाच रात्री चोरांनी चार मंदिरांना लक्ष्य केले होते. हा प्रकार बंद झाला आहे, असे वाटले असतानाच बुधवारी (ता. २४ जुलै ) रोजी दोन मंदिरे फोडण्याच्या घटना घडल्या.

चोरांच्या या कारवाया पाहता, डिचोली शहरात मंदिरे फोडणारी टोळी कार्यरत असल्याचा संशय बळावला आहे. या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवारी) डिचोली पोलिसांतर्फे डिचोलीतील विविध देवस्थान समिती पदाधिकाऱ्यांची एक बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीस विविध देवस्थानांचे मिळून ३० हून अधिक पदाधिकारी उपस्थित होते.

फंडपेट्या रिकामी करा

पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत मंदिरांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आला. देवस्थान समित्यांनी मंदिरातील फंडपेट्या ठरावीक दिवसांनी रिकाम्या कराव्यात. देवदेवतांच्या अंगावर दागिने ठेवू नयेत, असे आवाहन पोलिसांनी देवस्थान समितींना केले.

बुधवारी मध्यरात्री फोडण्यात आलेल्या दोन्ही मंदिरांनी सीसी टीव्ही कॅमेरे नव्हते, असे तपासात स्पष्ट झाले आहे. देवस्थान समित्यांना आवश्यक त्यावेळी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधिकाऱ्यांनी केले. रात्रीच्यावेळी पोलिसांनी गस्त सुरू करावी, अशी मागणी काही पदाधिकाऱ्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: गोव्याची झुंज अपयशी! 'विजय हजारे ट्रॉफी'त महाराष्ट्राचा 5 धावांनी विजय, ऋतुराजची शतकी खेळी पडली 'महागात'

eSakal Comscore: मराठी मीडियात 'ई-सकाळ'चा डंका! 19.5 मिलियन युजर्ससह ठरली देशातील नंबर वन वेबसाइट

माजी मुख्य न्यायमूर्ती रिबेलोंच्या निवेदनाचा अभ्यास करून पुढील निर्णय : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Goa Traffic Police: 'बेशिस्त' वाहनचालकांना वाहतूक पोलिसांचा दणका! वर्षभरात 94 लाखांहून अधिक दंड वसूल; 5,025 जणांवर कारवाई

Lokayukta Goa: गोव्याला मिळणार नवे लोकायुक्त! न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT