Bicholim  Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : ‘डिचोली शांतादुर्गा’चा ‘हेमंतोत्सव’ उत्साहात

Bicholim News : हिराबाई झांट्ये स्मृती सभागृहात विद्यार्थ्यांचे सादरीकरण

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली, विद्यावर्धक मंडळ संचलित डिचोली येथील श्री शांतादुर्गा शिशुवाटिकेचा ‘हेमंतोत्सव’ अर्थातच स्नेहसंमेलन मंगळवारी (ता.१९) उत्साहात साजरे करण्यात आले.

येथील हिराबाई झांट्ये स्मृती सभागृहात आयोजित सोहळ्यात विद्यावर्धक मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी दीप प्रज्वलित करून स्नेहसंमेलनाचे उद्‌घाटन केले.

यावेळी उपाध्यक्ष सदाशिव वालावलीकर, सचिव अभिजीत तेली, खजिनदार राजेश धोंड, शिशुवाटिकेचे व्यवस्थापक डॉ. कौस्तुभ पाटणेकर, अरुण साळकर, शिशुवाटिकेच्या प्रमुख शिक्षिका मोनिका प्रधान आणि अन्य शिक्षिका उपस्थित होत्या.

मोनिका प्रधान यांनी प्रास्ताविक करून अहवाल सादर केला. नीता कशाळीकर यांनी स्वागत करून आभार मानले. या स्नेहसंमेलनास पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हेमंतोत्सव यशस्वी करण्यासाठी शिक्षिका आणि सेविकांनी मेहनत घेतली.

‘रामगाथा’ला प्रेक्षकांकडून दाद :

उद्‌घाटनानंतर चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. गणेश स्तवनासह मुलांनी विविध प्रकारचे नृत्य सादर करून उपस्थितांकडून वाहवा मिळवली. श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर आधारित ‘रामगाथा’ या नृत्यप्रकाराने तर कार्यक्रमाची शान वाढवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सरकारी कार्यालयांत शुकशुकाट, वास्कोत परिणाम; वर्षअखेर बहुतांश कर्मचारी रजेवर

Arpora Nightclub Fire: हडफडेतील क्लब संरचना मूलतःच बेकायदेशीर, व्यापार परवाना नाही हे माहित होते; पंचायत सचिवाची जबानी

2026 New Rules: गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून लागू झाले 'हे' 8 नवे नियम! सामान्यांच्या खिशाला कात्री

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नववर्षाची मोठी भेट; 8 व्या वेतन आयोगाच्या कामाला अधिकृत सुरुवात, पगार 35 टक्क्यांनी वाढणार?

Goa Politics: काँग्रेस नेत्यांमध्ये कुठ्ठाळीत राडा! 'गेट आऊट' म्हणत नेत्याने गटाध्यक्षाला बदडले, सिमोईस यांच्या विरोधात तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT