केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नववर्षाची मोठी भेट; 8 व्या वेतन आयोगाच्या कामाला अधिकृत सुरुवात, पगार 35 टक्क्यांनी वाढणार?

8th Pay Commission: नवीन वर्ष केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे.
8th Pay Commission
8th Pay CommissionDainik Gomantak
Published on
Updated on

नवीन वर्ष केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. केंद्र सरकारने ८ व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, आज १ जानेवारीपासून यासंदर्भातील गणना प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या निर्णयामुळे देशातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि निवृत्ती वेतनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नोव्हेंबर महिन्यातच सरकारने या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला होता.

वेतनामध्ये ३५ टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता

हवामान आणि आर्थिक तज्ज्ञांच्या मते, ८ व्या वेतन आयोगामध्ये 'फिटमेंट फॅक्टर' २.४ ते ३ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. जर हे निकष लागू झाले, तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात २० ते ३५ टक्क्यांपर्यंत घसघशीत वाढ होऊ शकते. यामुळे कर्मचाऱ्यांचे राहणीमान सुधारण्यास मदत होईलच, शिवाय महागाईच्या काळात मोठा आर्थिक आधारही मिळेल. सरकारने आयोगाला आपला सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा अवधी दिला आहे, ज्यामध्ये वेतन, भत्ते आणि पेन्शनच्या संरचनेची सखोल पुनरावलोकन केले जाईल.

8th Pay Commission
Goa Politics: काँग्रेस नेत्यांमध्ये कुठ्ठाळीत राडा! 'गेट आऊट' म्हणत नेत्याने गटाध्यक्षाला बदडले, सिमोईस यांच्या विरोधात तक्रार दाखल

अंमलबजावणीसाठी वाट पाहावी लागणार

जरी १ जानेवारी २०२६ पासून या नवीन वेतन आयोगाची गणना ग्राह्य धरली जाणार असली, तरी प्रत्यक्ष वाढीव पगार हातात येण्यासाठी कर्मचाऱ्यांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ८ व्या वेतन आयोगाची प्रत्यक्ष अंमलबजावणी २०२८ पासून होऊ शकते. असाच प्रकार ७ व्या वेतन आयोगाच्या वेळीही घडला होता; तेव्हा जानेवारी २०१६ पासून आयोग लागू झाला होता, मात्र सरकारने त्याला जूनमध्ये मंजुरी दिली होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांना थकीत रक्कम (Arrears) देण्यात आली होती. यावेळीही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कर्मचाऱ्यांना मागील फरकाची रक्कम मिळण्याची शक्यता आहे.

लाखो कुटुंबांना होणार फायदा

या निर्णयाचा थेट परिणाम केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या लाखो वर्तमान कर्मचाऱ्यांवर आणि पेन्शनधारकांवर होणार आहे. वेतन आयोगाच्या माध्यमातून केवळ पगारच वाढत नाही, तर घरभाडे भत्ता (HRA), प्रवास भत्ता आणि इतर सोयी-सुविधांमध्येही सुधारणा केली जाते. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारने घेतलेल्या या सकारात्मक निर्णयामुळे कर्मचारी संघटनांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com