Bicholim  Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : डिचोलीत ‘शिवमय’ वातावरण; शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

Bicholim News : यावेळी डॉ. कौस्तुभ पाटणेकर, मंदार गावडे, पापुराज मयेकर, गोविंद चोडणकर, रोहन शिरगावकर, प्रदीप नाईक, शांतीसागर, संजय नाईक, किरण तुळपुळे, सुवर्णा परब, मल्लिकार्जुन पाटील, सूर्यकांत देसाई, उदय जांभेकर आदी वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या डिचोली नगरीत गुरुवारी (ता.२०) तिथीनुसार शिवराज्याभिषेक मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ आदी घोषणा देत शिवप्रेमींनी शहरात ‘शिवमय’ वातावरण निर्मिती केली.

बजरंग दल, विश्र्वहिंदू परिषद आणि डिचोलीतील शिवप्रेमींच्या सहकार्याने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सकाळी आगमन घोषणा, मंत्रोच्चारण आदी कार्यक्रमांसह शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानासमोरील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला जल आणि दुग्धाभिषेक करण्यात आला.

यावेळी डॉ. कौस्तुभ पाटणेकर, मंदार गावडे, पापुराज मयेकर, गोविंद चोडणकर, रोहन शिरगावकर, प्रदीप नाईक, शांतीसागर, संजय नाईक, किरण तुळपुळे, सुवर्णा परब, मल्लिकार्जुन पाटील, सूर्यकांत देसाई, उदय जांभेकर आदी वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यानंतर शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज सर्कलवरील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ मूर्तीला अभिवादन केले. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित शिवकालीन विषयावरील वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ५ ते ७ आणि ८ ते १२ अशा दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली.

विधिवत शिवराज्याभिषेक

सायंकाळी दीनदयाळ भवन सभागृहात छत्रपती शिवरायांचा विधीवत राज्याभिषेक साजरा करण्यात आला. या सोहळ्यास शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख मंगेश पाटील प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे व्याख्यान झाले. संजय म्हापसेकर यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्‌घाटन झाले. याप्रसंगी नरेश कडकडे, सुरेश नेवगी, कृष्णा मराठे, शेखर नाईक, गायत्री पाटील आदी शिवप्रेमी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT