Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Bicholim Accident: डिचोलीत भीषण अपघात; 16 वर्षीय मुलाचा मृत्यू , धाकटा भाऊ गंभीर

Bicholim Sanquelim Accident: चारचाकी आणि मोटारसायकलमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या अल्पवयीनाचे नाव मोहम्मद सादिक खानजादे असे आहे.

Sameer Panditrao

डिचोली: चारचाकी आणि मोटारसायकलमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या अल्पवयीनाचे नाव मोहम्मद सादिक खानजादे असे आहे. मोटारसायकलवर मागे बसलेला त्याचा धाकटा भाऊ १४ वर्षीय हजरत अली खानजादे हा गंभीर जखमी असून त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

हा अपघात रविवारी सायंकाळी डिचोली-साखळी मुख्य रस्त्यावर कुळण-सर्वण येथे आधार हॉस्पिटलजवळ घडला. डिचोलीत राहणारे आणि मूळ कुळे-धारबांदोडा येथील मोहम्मद सादिक आणि हजरत २-बी-२४६१ या क्रमांकाच्या मोटारसायकलवरुन साखळीहून डिचोलीच्या दिशेने जात होते.

जीए-०३-बी-७०९१ या क्रमांकाची ‘ओमनी व्हॅन’ साखळीच्या दिशेने जात होती. वाठादेव येथे राहणारे पांडुरंग मालवणकर हे व्हॅन चालवत होते. कुळण येथे पोचताच मोटारसायकल आणि व्हॅनची समोरासमोर जबर धडक बसली. यात दुचाकीचालक १६ वर्षीय मोहम्मद सादिक आणि त्याचा भाऊ हजरत अली हे दोघेही गंभीर जखमी झाले.

जखमींना उपचारार्थ इस्पितळात नेले असता, डॉक्टरांनी मोहम्मद सादिक याला मृत घोषित केले. डिचोली पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी डिचोली पोलिसांनी व्हॅन चालकास अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुवर्णसंधी! गोव्यातील तरुणांसाठी मुख्यमंत्र्यांचा 'नोकरी धमाका', 5000 पदांची होणार भरती; बेरोजगारीच्या प्रश्नावर सरकारचा मास्टरस्ट्रोक

India Russia Oil Import: "दुसऱ्यांच्या तालावर नाचणारा भारत नाही'' रशियन तेल खरेदीसाठी देशाला अमेरिकेच्या परवानगीची गरज नाही; ऊर्जा निर्णयात सरकार सार्वभौम

Goa Education: महिलांसाठी 'मुख्यमंत्री उडान भरारी'ची मोठी घोषणा, मुलींना शाळेतच मिळणार सॅनिटरी पॅड! वाचा अर्थसंकल्पातील 4 महत्त्वाचे निर्णय

Goa Budget Session: अयोध्येतील ‘श्री राम निवास’साठी 25 कोटी! जागा सरकारच्या ताब्यात; रामलल्लाच्या भाविकांसाठी CM सावंतांनी दिली खूशखबर

Goa Budget Session 2026: गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 2025 मध्ये 1 कोटीहून अधिक पर्यटकांनी दिली भेट; मोपा विमानतळ ठरलं गेमचेंजर

SCROLL FOR NEXT