Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim: डिचोलीत मजुरांचा टक्का वाढला, स्थानिकांना चिंता; भाडेकरू पडताळणीबाबत प्रश्नचिन्ह

Bicholim Migrant Labour Issues: शहरात परप्रांतीय मजुरांची समस्या कायम असून, ते स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या मजुरांचा आकडाही वाढत चालला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: शहरात परप्रांतीय मजुरांची समस्या कायम असून, ते स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या मजुरांचा आकडाही वाढत चालला आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून शहरात नवीन मजुरांची भर पडली असून, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड या राज्यांतून हे मजूर दाखल झाले आहेत.

नव्याने आलेल्या परप्रांतीय मजुरांकडे पोलिस कार्ड आदी आवश्यक कागदपत्रे आहेत की नाहीत, याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाडेकरू पडताळणी मोहीम राबविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. दरम्यान, अधूनमधून पोलिस या मजुरांची धरपकड करीत असल्याचे दिसून येते; मात्र अजूनतरी मजुरांच्या गर्दीवर नियंत्रण आलेले नाही.

गेल्या बऱ्याच वर्षांपासून डिचोलीत परप्रांतीय मजुरांची संख्या हळूहळू वाढत आहे. मजुरीच्या शोधात रोज सकाळी शहरात मजुरांचा वावर असतो. त्यात बसस्थानक परिसरात उभे राहणाऱ्या मजुरांची संख्या मोठी आहे.

बसस्थानक परिसरात रोज सकाळी तास-दीड तास कर्नाटक, झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांतील मिळून ६०० हून अधिक मजूर दाटीवाटीने उभे राहिलेले दिसून येतात. त्यात काही स्थानिक मजुरांचाही समावेश असतो.

रोज सकाळी आठ वाजल्यापासून बसस्थानक परिसरात मजुरांची गजबज असते. बसस्थानक परिसरात त्यांची संख्या अधिक असते.

अनर्थ घडण्याची भीती

बसस्थानक परिसरातील मजुरांचा अडथळा दूर करण्यासाठी पोलिसांनी कारवाई केल्यास काही दिवस हे मजूर जागा बदलतात; मात्र काही दिवसांनी पुन्हा बसस्थानक परिसरात गर्दी करतात. बसस्थानकाबाहेर दाटीवाटीने उभे राहणाऱ्या या मजुरांमुळे सकाळी साधारण एक-दीड तास वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो.

मजुरांच्या गर्दीमुळे प्रवासी बसगाड्या आत-बाहेर घेताना बसचालकांना अक्षरशः कसरत करावी लागते. एखाद्या वेळी मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिका किंवा संबंधित यंत्रणांनी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांसह जागरूक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Labh Drishti Yog 2026: करिअरमध्ये अचानक मिळणार मोठी संधी! सूर्य-गुरुच्या योगानं 'या' राशींचा होणार भाग्योदय; ग्रहांची चाल बदलणार तुमचं आयुष्य

Goa Crime: 'त्या' डॉक्टर महिलेला मिळाला न्याय! विनयभंग करणाऱ्या नराधमांना कोर्टचा दणका; दळवी, कांदोळकरांना ठोठावली कारावासाची शिक्षा

Margao Sopo Tax Protes: मालवाहू वाहनांवरील सोपो वसुली रद्द करा! व्यापारी संघटनेची आक्रमक मागणी; मडगावात वसुली ‘माफिया पद्धतीने’ होतेय

गोवा हीच एक प्रयोगशाळा! संपादकीय

Viral Video: "शाळाच तोडून टाकीन!" छोट्या डॉनची थेट मास्तरांना धमकी, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरीही हक्काबक्का; म्हणाले, 'बच्चा खतरनाक है भाई'

SCROLL FOR NEXT