Premendra Shet  Gomantak Digital Team
गोवा

Bicholim News : मुलांचे भवितव्य पालकांवर अवलंबून - प्रेमेंद्र शेट

प्रेमेंद्र शेट : दहावी, बारावीतील गुणवंतांचा गौरव

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली : शिक्षक हे मुलांना घडविण्याची जबाबदारी पार पाडतात. मात्र मुलांना सुसंस्कारित करण्याची आणि त्यांचे भवितव्य घडविण्याची जबाबदारी पालकांची आहे. असे मत मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी व्यक्त केले. मये येथे आयोजित दहावी आणि बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात प्रेमेंद्र शेट प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

आजचे विद्यार्थी हे देशाचे भावी नागरिक आहेत. तेव्हा मुलांच्या भवितव्याचा विचार करून पालकांनी शिक्षकांप्रमाणेच आपली जबाबदारीही ओळखून त्यांना यशाचा मार्ग दाखवून आदर्श नागरिक घडवावे. असे आवाहनही आमदार शेट यांनी केले.

शनिवारी (ता. २७) कुंभारवाडा-मये येथील श्री सातेरी मंदिर सभागृहात आयोजित या सोहळ्याप्रसंगी शिक्षणतज्ञ कांता पाटणेकर प्रमुख वक्ते या नात्याने उपस्थित होते. अन्य मान्यवरात मये आणि कारापूर-सर्वणचे जिल्हा पंचायत सदस्य अनुक्रमे शंकर चोडणकर आणि महेश सावंत, मयेची सरपंच सुवर्णा चोडणकर भाजपचे प्रवक्ते प्रेमानंद म्हांबरे, मये भाजप मंडळ अध्यक्ष दयानंद कारबोटकर यांचा समावेश होता.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

श्री सातेरी सेवा संघ आणि मये भाजपतर्फे गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या मये मतदारसंघातील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. मये मतदारसंघात येणाऱ्या चोडण गावातील ओंकार कामत हा विद्यार्थी हा यंदाच्या दहावीच्या परीक्षेत प्रथम आला आहे.

त्याच्यावतीने त्याची आई आणि आजोबांनी गौरव स्वीकारला. पिळगावच्या आयडियल हायस्कूलचा मैनुद्दीन शेख या दिव्यांग विद्यार्थ्याचाही गौरव करण्यात आला. या सोहळ्यात के. बी. हेडगेवार हायस्कूलचे मुख्याध्यापक मिशाळ यांचा सत्कार करण्यात आला. शंकर चोडणकर यांनी प्रास्ताविक केले. विश्वास चोडणकर यांनी सूत्रसंचालन केले.

शिक्षकी पेशा सर्वश्रेष्ठ

आजचे कर्तृत्वान शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे खरे शिल्पकार असून, शिक्षकी पेशा हा सर्वश्रेष्ठ आहे. शिक्षकांनी हा पेशा एक ''मिशन'' म्हणून स्वीकारावा. विद्यार्थ्यांना ''करियर'' संबंधी मार्गदर्शन होणे काळाची गरज आहे. नवी पिढी सक्षम घडविण्याच्या कामात शिक्षकाचा मोठा वाटा असतो. त्यामुळे आधुनिक काळातील आव्हान लक्षात घेऊन शिक्षकांनी मार्गदर्शन करावे, असेही श्री. पाटणेकर म्हणाले. याप्रसंगी प्रेमानंद म्हांबरे यांनी आपले विचार व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT