Bicholim Police Residential Complex Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : डिचोली पोलिस ठाण्याची जुनी इमारत मोडकळीस; मोजतेय अखेरच्या घटका

गुरांसाठी बनली आश्रयस्थान

दैनिक गोमन्तक

एकेकाळी ज्या इमारतीतून कायद्याचे रक्षक काम करायचे, ती शहरातील पोलिस ठाण्याची जुनी इमारत पूर्णपणे मोडकळीस आली आहे. सध्या विनावापर असलेली ही इमारत पूर्णपणे जर्जर झाली असून, ती शेवटच्या घटका मोजत असल्याचे जाणवत आहे. इमारतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून, ही इमारत सध्या गुरांचे आश्रयस्थान बनली आहे.

या इमारतीच्या जागी महत्त्वाकांक्षी असा बहुउद्देशीय प्रकल्प बांधण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. या बहुउद्देशीय प्रकल्पाचे स्वप्न कधी पूर्णत्वास येईल, तेव्हा येऊ द्या. तूर्तास पोलिस ठाण्याच्या जुन्या इमारतीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जुलै 2016 मध्ये पोलिस ठाणे नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात आले. आधीच पोलिस ठाण्याच्या जुन्या इमारतीची दुरवस्था झाली होती. पोलिस ठाण्याचा कारभार नवीन इमारतीत सुरू झाल्यानंतर पूर्वीची इमारत जवळपास तीन वर्षे विनावापर होती.

नंतर नवीन इमारत बांधण्यासाठी सरकारी केंद्रशाळेची पोलिस ठाण्याच्या जुन्या इमारतीत व्यवस्था करण्यात आली. शाळेचे वर्ग स्थलांतरित करण्यापूर्वी या इमारतीची काही प्रमाणात डागडुजी करण्यात आली.

गेल्यावर्षी शाळा नवीन इमारतीत स्थलांतरित केल्यापासून पोलिस ठाण्याच्या जुन्या इमारतीची अजिबात देखभाल झालेली नाही. या इमारतीची पडझड होत असून, छपराची कौलेही फुटली आहेत. त्यामुळे या इमारतीत मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी गळत आहे.

सर्वत्र अस्वच्छता

पोलिस ठाण्याच्या जुन्या इमारतीत चालणारे शाळेचे वर्ग गत शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस नवीन सुसज्ज इमारतीत स्थलांतरित करण्यात आले. तेव्हापासून ही इमारत ओस पडली आहे. सध्या ही इमारत गुरांचे आश्रयस्थान बनली आहे.

दिवसारात्र या इमारतीत गुरांचा वावर असतो. त्यामुळे ही इमारत की गुरांचा गोठा, असा प्रश्न प्रत्येकाला पडत आहे. इमारतीत सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT