Goa Bird Maping Survey : गोव्यात ‘पक्षी नकाशा’ साठी लवकरच सर्वेक्षण; पक्षीप्रेमी संघटनांची मदत

370 चौ.कि.मी. वनक्षेत्राची पाहणी : केरळनंतर गोवा ठरणार देशातील दुसरे राज्य
Goa State Bird
Goa State Bird Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Bird Maping Survey : गोव्‍यातील विविध भागात असलेल्‍या पक्ष्‍यांचे सर्वेक्षण करुन राज्‍याचा ‘पक्षी नकाशा’ तयार करण्‍याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम पक्षीप्रेमी संघटनांच्‍या साहाय्‍याने हाती घेण्‍यात येणार असून केरळनंतर असा अभिनव उपक्रम हाती घेणारे गोवा हे दुसरे राज्‍य ठरणार आहे.

गोव्‍यातील पक्ष्‍यांचे अस्‍तित्‍व, कुठल्‍या भागात त्‍यांचे जास्‍त प्रमाण आहे आणि कुठल्‍या भागात कमी, त्‍यांच्‍यावर झालेला हवामान बदलाचा परिणाम तसेच कुठल्‍या मौसमात हे पक्षी दिसतात याचा शास्‍त्रोक्‍त अभ्‍यास करण्‍यासाठी हे सर्वेक्षण हाती घेतले जाणार आहे.

Goa State Bird
गोव्यातील रोहित शेट्टीला मुंबई पोलिसांकडून अटक, एका मिनिटांत कुलूप तोडून करायचा घर साफ

‘गोव्‍यातील पक्ष्‍यांची परिपूर्ण माहिती उपलब्‍ध असावी आणि कुठल्‍या मोसमात कुठले पक्षी गोव्‍यात असतात याची माहिती संकलन करण्‍यासाठी हा उपक्रम हाती घेण्‍यात आला आहे’,अशी माहिती या अभ्‍यासाचे प्रमुख असलेले पर्यावरण तज्‍ज्ञ प्रणॉय बैद्य यांनी दिली.

या सर्वेक्षणांतून जी माहिती हाती येईल त्‍यातून पक्ष्‍यांचे संवर्धन कसे करता येईल, त्‍यांच्‍यातील वाढ करण्‍यासाठी कुठले उपाय घेणे शक्‍य आहे. तसेच हवामान बदलाचा त्‍यांच्‍यावर काय परिणाम होऊ शकतो याची माहिती उपलब्‍ध होऊ शकेल, असे बैद्य यांनी सांगितले.

(ओला कालावधी) ऑगस्‍ट ते ऑक्‍टोबर या दरम्‍यान पहिले सर्वेक्षण होणार असून दुसरे सर्वेक्षण डिसेंबर ते फेब्रुवारी (सुका कालावधी) या दरम्‍यान केले जाणार आहे.

Goa State Bird
आत्मा’कडून पौष्टिक तृणधान्य लागवडीवर भर; नाचणी, वरी पिकाला राज्‍यात चांगली बाजारपेठ

अरण्‍य एनव्‍हायरमंेंट रिसर्च ऑर्गनायझेशनचे जल्‍मेश कारापूरकर तसेच सेंटर फॉर एनव्‍हायरमंेंट एज्‍युकेशनचे सुजीतकुमार डाेंगरे यांचा या उपक्रमात प्रमुख सहभाग असेल. गोवा वन खाते, गोवा विद्यापीठ, गोवा जैव विविधता मंडळ, गोवा पाणथळ प्राधिकरण, बर्ड काऊन्‍ट इंडिया यासारख्‍या संस्‍था या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

हे सर्वेक्षण जरी वैज्ञानिक स्‍वरूपाचे असले तरी त्‍याला स्‍थानिक स्‍वरूप दिले जाणार असून या उपक्रमात शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, पक्षीप्रेमी यांना सामावून घेतले जाणार आहे. सध्‍या लुप्त होण्‍याच्‍या वाटेवर असलेला

  • 370 चौ.कि.मी. क्षेत्राचा होणार अभ्‍यास

  • 60 दिवसांचे होणार सर्वेक्षण

  • २२ संस्‍था सर्वेक्षणासाठी येणार एकत्र.

  • गोव्यातील पक्षी सर्वेक्षण प्रतिनिधींसाठी जुलैमध्ये 4 कार्यशाळा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com