Bicholim Police News: Dainik Gomantak
गोवा

Bicholim News: मांडवी नदीतून बेकायदा वाळू चोरी करणाऱ्याला अटक; 14 हजाराची वाळू जप्त

गोमंतक ऑनलाईन टीम

Bicholim Police News: मांडवी नदीतून बेकायदेशीररित्या वाळू उपसा करून वाळूची चोरी केल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी एका ट्रकचालकास अटक केली आहे. राजेश किनाप्पा चव्हाण (वय 45) असे त्याचे नाव आहे. तो मूळचा तिस्क, सावर्डे, सांगे येथील रहिवासी आहे.

त्याच्याकडून 14 हजारांची वाळू जप्त करण्यात आली आहे. तसेच टिप्पर ट्रक GA 09 T 6265 देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्याच्यासोबत आणखी दोघांविरोधात डिचोली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी एक जण ट्रकमालक आहे.

आनंद मंगेश दळवी असे त्याचे नाव आहे. तो बागवाडा, सावर्डे, सांगे येथील रहिवासी आहे. तर बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या सुशांत नाईक याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो बेतकी येथील रहिवासी आहे.

माईन्स अँड मिनरल्स डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन अॅक्ट 1957 या कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक विकेश हडफडीकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला गेला.

कोणत्याही अधिकृत परवाना, परवानगीशिवाय हा वाळू उपसा केला जात होता. ही वाळू परस्पर विविध ठिकाणी पोहचवली जात होती. या वाळूची चोरटी वाहतूक केली जात होती. या प्रकरणाचा पुढील तपास एएसआय शिवा नाईक करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT