Dainik Gomantak  Bicholim Farmers against Vedanta:
गोवा

Goa Mining: स्थानिकांना कामावर घेणार नसाल तर शेती परत द्या; संतप्त शेतकऱ्यांचा ‘वेदांता’ला इशारा

पिळगावमधील शेतकरी संघटीत; कामगारांना घरी पाठवल्याने शेतकरी आक्रमक

दैनिक गोमंतक

Bicholim Farmers against Vedanta: वेदांता (सेसा) खाण कंपनीने स्थानिक कामगारांना घरी पाठवल्याने पिळगावमधील शेतकरी आता आक्रमक बनले आहेत. स्थानिकांना कामावर घेत नसाल, तर आमच्या शेती पूर्ववत आम्हाला द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आम्हाला न्याय मिळाला नाही, तर सारमानस रस्त्यावरून खनिज वाहतूक करण्यास प्रतिबंध करण्यात येईल. वेळप्रसंगी न्यायालयात धाव घेण्यात येईल, असा इशाराही या शेतकऱ्यांनी दिला आहे.

पिळगावमधील कामगारांना खाण कंपनीने घरी पाठविल्याने कामगारांसह स्थानिक शेतकरी आता आक्रमक बनले आहेत. संतप्त शेतकऱ्यांसह शंभरहून अधिक लोक रविवारी (ता. 26) सारमानस रस्त्यावर उतरले. या शेतकऱ्यांनी खाण कंपनी विरोधात दंडही थोपटले आहे.

जवळपास अर्धा तास रस्त्यावर धरणे धरल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मोकळ्या केल्या. बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेले स्थानिक कामगारही शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरले होते.

कामगारांना केले बेरोजगार

गावातील लोकांना रोजगार मिळणार या आशेने आम्ही शेतजमिनीवर पाणी सोडून खाण कंपनीला सहकार्य केले होते. मात्र, आता खाण कंपनीने गावावरच अन्याय केला आहे. खाण व्यवसायामुळे आमच्या शेतजमिनी नष्ट झाल्या आहेत.

खाणमाती आदी गाळ साचून शेतजमिनी बुजल्या आहेत. त्यामुळे गेल्या बऱ्याच वर्षांपासून शेती पडीक असून खाण कंपनीकडून नुकसान भरपाईही मिळत नाही.

आता तर वेदांता (सेसा) खाण कंपनीने स्थानिक कामगारांना काढून त्यांना बेरोजगार केले आहे, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली.

...तर न्यायालयात

नुकसान भरपाई सोडाच, उलट आता खाण कंपनीकडून स्थानिक कामगारांच्या पोटावर पाय ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता आम्ही करायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यासाठी आमच्या शेतजमिनी आम्हाला हव्या आहेत.

शेतीतील गाळ काढून आमच्या शेती आम्हाला द्या. अशी मागणी अनिल वायंगणकर, सुधाकर वायंगणकर आदी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास सारमानस रस्त्यावरुन खनिज वाहतूक करायला देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

वेळप्रसंगी राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागण्यात येईल. असे सुधाकर वायंगणकर यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT