Bicholim Municipal Ward Delimitation Ordinance Cancelled Dainik Gomantak
गोवा

पालिका प्रभाग फेररचना संबंधीचा अध्यादेश रद्द, निर्णयाचे डिचोलीतील इच्छुकांकडून स्वागत; काही मावळत्या नगरसेवकांना मोठा धक्का

Bicholim Municipal Ward Delimitation Ordinance Cancelled: पालिका प्रभाग फेररचना संबंधीचा अध्यादेश अखेर रद्द केल्याने निवडणुकीसाठी ‘बाशिंग’ बांधून तयार झालेल्या डिचोलीतील इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: पालिका प्रभाग फेररचना संबंधीचा अध्यादेश अखेर रद्द केल्याने निवडणुकीसाठी ‘बाशिंग’ बांधून तयार झालेल्या डिचोलीतील इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

फेररचना रद्द करण्याचा राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे डिचोलीतील अनेकांनी स्वागत केले आहे. फेररचनेंतर्गत डिचोली पालिकेचे बहुतेक प्रभाग फोडल्याने काही मावळत्या नगरसेवकांसह मतदारांना मोठा धक्का बसला होता.

प्रभाग वाढविण्यात आले नसले, तरी चौदापैकी अकरा प्रभागांची फेररचना करण्यात आली होती, तर निवडक तीन प्रभागांना हात लावण्यात आला नव्हता. फेररचनेमुळे संबंधित प्रभागात नाराजी पसरली होती.

सुनावणीवेळी झाला होता विरोध

प्रभाग फेररचनेला आक्षेप घेत डिचोलीतील काही मतदारांनी निवडणूक अधिकारी तथा डिचोलीचे उपजिल्हाधिकारी शुभम नाईक यांच्याकडे अंतिम मुदतीपर्यंत लेखी हरकती दाखल केल्या होत्या. या हरकतीसंबंधी गेल्या ८ एप्रिल रोजी डिचोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली होती. या सुनावणीवेळी प्रत्येकाच्या सूचना आणि हरकती उपजिल्हाधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्या होत्या.

प्रभागांची फेररचना अन्यायकारक आहे. पालिका प्रशासन खात्याच्या २०२१ च्या अधिसूचनेला अनुसरून प्रभाग फेररचना करण्यात आलेली नाही. उलट चुकीच्या पद्धतीने केली आहे. आदी मुद्दे हरकत घेतलेल्या मतदारांनी उपस्थित करून फेररचना मागे घ्यावी, अशी मागणी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. आता हा अध्यादेश रद्द केल्याने फेररचनेला आक्षेप घेतलेल्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोरेपणाच्या मोहात आरोग्य धोक्यात? नागपुरातील 18 महिलांना किडनीचा त्रास; 'Made in Pakistan' फेअरनेस क्रीमवर गंभीर आरोप

Goan Food Culture: अळवा, वाल अन् पालक भाजीला 'वडी'ची फोडणी! कोंकणी खाद्यसंस्कृतीचा चेहरा बदलणारा एक पारंपारिक पदार्थ

Goa Education: अनुदानित शाळांतील विद्यार्थी संख्‍येत घट; विनाअनुदानित शाळांतील संख्‍येत मात्र सातत्‍याने होतेय वाढ

'Telegram'ला 15 दिवसांचा अल्टिमेटम! चित्रपट आणि OTT कंटेंटप्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका, पायरसीविरोधात मोठं पाऊल

Goa Solar Scheme: राज्याची सौर अनुदान योजना रखडली; शेकडो अर्जदार प्रतीक्षेत, 3 वर्षे मुदतवाढीची अधिसूचना अद्याप नाही

SCROLL FOR NEXT