Dahi Handi Celebration Goa Dainik Gomantak
गोवा

Bicholim Dahi Handi :डिचोलीच्या दहीहंडीत आमदारांनी धरला ठेका, Video Viral!

Bicholim MLA Chandrakant Shetye: उत्साहाचा भाग म्हणून डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी देखील स्थानिक नागरिकांसोबत दहीहंडीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.

Akshata Chhatre

Chandrakant Shetye Dahi Handi Video: श्रावण महिन्यातील दहीहंडीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण करून देणाऱ्या या सणात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण मोठ्या आनंदाने सहभागी होतात. याच उत्साहाचा भाग म्हणून डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी देखील स्थानिक नागरिकांसोबत दहीहंडीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.

डॉ. शेट्ये यांनी रिंगणात धरला ठेका (MLA Chandrakant Shetye)

डिचोलीतील भायली पेठ येथे आयोजित केलेल्या या दहीहंडी उत्सवात डॉ. शेट्ये यांनी पारंपरिक पद्धतीनुसार लोकांसोबत खांद्याला खांदा लावून गोलाकार रिंगणात ठेका धरला. या क्षणाचा व्हिडिओ त्यांनी स्वतः शेअर केला असून, त्यांच्या या सक्रिय सहभागाचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. लोकप्रतिनिधी सणासुदीत लोकांसोबत मिसळत असल्याचे पाहून अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

गोव्याच्या दहीहंडीत 'पुष्पा'ची एन्ट्री!

दरम्यान, गोव्यातील दहीहंडी उत्सवात केवळ स्थानिकच नाही, तर मनोरंजक आणि वेगळे प्रयोगही पाहायला मिळाले. मडगावमध्ये आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमात अचानक एक व्यक्ती 'पुष्पा' चित्रपटातील नायकाच्या वेशभूषेत दाखल झाला. त्याला पाहून 'हा खरा अल्लू अर्जुन तर नाही ना?' असा प्रश्न क्षणभर उपस्थितांना पडला.

'पुष्पा'ने हुबेहूब अल्लू अर्जुनची नक्कल करत, एका जीपमधून खास स्टाईलमध्ये एन्ट्री घेतली. हातात चमकणारी कुऱ्हाड घेऊन आणि खास अंदाजात नाच करत त्याने सर्वांना थक्क केले. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, या अनोख्या एन्ट्रीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: लहान मुलांना वाचविण्यासाठी जर्मन शेफर्डने बाल्कनीतून घेतली उडी; पाहा व्हिडिओ

Virat Kohli Debut: रन मशीन, चेस मास्टर... आजच्याच दिवशी क्रिकेट विश्वाला मिळाला 'किंग', 17 वर्षांच्या प्रवासातील विराटचे 3 'सुवर्ण क्षण'

Budget Friendly India Tour: दिल्ली, गोवा, जयपूर...14 दिवसांत भारत दर्शन; कसा कराल बजेटफ्रेन्डली प्रवास? वाचा प्लॅन

Viral Video: "असले मित्र नको रे बाबा!" धोकादायक मस्करीचा व्हिडिओ व्हायरल; त्याची 'ही' अवस्था पाहून नेटकरी संतप्त

Operation Sindoor: पाकिस्तानच्या ‘पळपुट्या' नौदलाची पोलखोल! ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान नौका ग्वादर बंदरात लपवल्या; सॅटेलाईट फोटोंमधून खुलासा

SCROLL FOR NEXT