Bicholim water crisis, Mayem drinking water problem, Goa water shortage Dainik Gomantak
गोवा

Bicholim Water Crisis: डिचोलीत 3 दिवसांपासून नळ कोरडे! जनतेत संताप; पाण्यासाठी गृहिणींवर अश्रू गाळण्याची पाळी

Goa Water Crisis: सलग तिसऱ्या दिवशीही नळ कोरडे राहिल्याने डिचोलीसह मये भागातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी मोठी मारामारी सहन करावी लागली.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: सलग तिसऱ्या दिवशीही नळ कोरडे राहिल्याने डिचोलीसह मये भागातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी मोठी मारामारी सहन करावी लागली. पाणी पुरवठा ठप्प झाल्याने डिचोलीसह मयेतील ग्रामीण भागात हाहाकार माजला आहे. तीन दिवसांपासून नळांना पाणी नसल्याने विशेष करून गृहिणींचे तर अक्षरशः हाल झाले आहेत.

पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाणी पुरवठा होणाऱ्या बहुतेक भागातील गृहिणींना तर पाण्यासाठी भटकंती करावी लागली. तीन दिवसांपासून नळ कोरडे राहिल्याने गृहिणीवर पाण्यासाठी डोळ्यातून अश्रू गाळण्याची पाळी आली आहे.

(सोमवारी) सकाळपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही, तर संबंधित खात्याच्या कार्यालयावर मोर्चा नेण्यात येईल. असा इशारा संतप्त बनलेल्या गृहिणींनी दिला आहे.

पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आज सायंकाळपर्यंत युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. सायंकाळी उशिरा नळांतून कमी दाबाचा पाणी पुरवठा सुरू झाला होता. मध्यरात्रीपर्यंत डिचोलीसह मये भागात पाणी पुरवठा पूर्वपदावर येईल, असा विश्वास ''पीडब्ल्यूडी''च्या खात्रीलायक सूत्रांनी व्यक्त केला आहे.

डिचोली शहरातील नाईकनगर-बोर्डे येथील सर्वे क्र. १४९/२ या जमिनीतून गेलेली ६०० मिमी व्यासाची जलवाहिनी स्थलांतरित करण्यासाठी शुक्रवारी आणि शनिवारी असे दोन दिवस डिचोलीसह मये भागात मर्यादित पाणी पुरवठा करण्यात येईल, असे ''पीडबल्यूडी''ने जाहीर केले होते.

मात्र दोन दिवस उलटल्यानंतर आज (रविवारी) नळांना पाणी येणार, अशी अपेक्षा होती. गृहिणी तर पाणी कधी येणार, त्याची डोळे लावून वाट पाहत होत्या. मात्र गृहिणींची घोर निराशा झाली. आज सायंकाळी उशिरापर्यंत नळ कोरडे राहिले होते.

...पुन्हा दुरुस्ती!

शनिवारी सायंकाळी जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले होते. मात्र जलवाहिनीतून पाणी सोडताच, उच्च दाब निर्माण होऊन जलवाहिनीची जोडणी सुटली. त्यामुळे जलवाहिनीची नव्याने दुरुस्ती करावी लागली. त्यामुळेच जाहीर केल्याप्रमाणे पाणीपुरवठा जाग्यावर घालणे ‘पीडबल्यूडी’ला शक्य झाले नाही. आता नळातून पाणी कधी वाहणार, या प्रतीक्षेत गृहिणी आहेत. पाणी नसल्याने गेल्या तीन दिवसांपासून गृहिणींचे हाल झाले आहेत, अशी खंत माजी जिल्हा पंचायत सदस्य मेघना येंडे यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curti Khandepar: फोंडा मतदारसंघाचा 50% भाग व्यापणारी 'कुर्टी - खांडेपार' पंचायत! झेडपी आरक्षण; आशा, निराशा व समीकरणे

Palolem Beach: पाळोळे किनाऱ्यावर वाद पेटला! पर्यटक बोटमालकांच्या 2 गटांत वितुष्ट; समझोत्यानंतरही धुसफूस सुरुच

India A vs SA: सिराज, कुलदीप, प्रसिध कृष्णा फेल! भारतीय गोलंदाजांचा 'फ्लॉप शो'; दक्षिण आफ्रिका संघाचा 417 धावांचा पाठलाग

Goa opinion: लडाखने जे करून दाखवले ते गोव्याला जमेल?

Ironman 70.3: मुख्यमंत्र्यांचे सचिव 'आयर्नमॅन', खडतर ट्रायथलॉनमध्ये मारली बाजी; संकेत आरसेकर यांनी पूर्ण केले तिहेरी आव्हान

SCROLL FOR NEXT