Bicholim  Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : प्लास्टिकचा वापर टाळून शहर स्वच्छ ठेवा! डिचोलीत विशेष प्रकल्पाचा शुभारंभ

Bicholim News : मिनरल फाऊंडेशनचा पुढाकार; एका विशेष सोहळ्यात पालिका आणि मिनरल फाऊंडेशनच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली, ‘सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळा आणि शहर कचरामुक्त ठेवा’ या संकल्पनेंतर्गत डिचोली शहरात विशेष प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. डिचोली पालिकेच्या सहकार्याने गोवा मिनरल फाऊंडेशनतर्फे हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

कचरा व्यवस्थापन महामंडळ, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ आदी संस्थांचेही या प्रकल्पाला पाठबळ मिळालेले आहे. एका विशेष सोहळ्यात पालिका आणि मिनरल फाऊंडेशनच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी डिचोली पालिकेचे मुख्याधिकारी सचिन देसाई, नगराध्यक्ष कुंदन फळारी, नगरसेवक विजयकुमार नाटेकर, मार्केट निरीक्षक रेखा मातोणकर, गजानन परवार, संजय खर्बे आदी कर्मचारी तसेच मिनरल फाउंडेशनचे प्रकल्प अधिकारी शिवदास देसाई, वरिष्ठ समन्वयक श्रद्धा रांगणेकर, स्वयंसेवक आदित्य बोट्टारकर, करिश्मा ताटे आदी उपस्थित होते.

‘सिंगल यूज प्लास्टिक’चा वापर बंद व्हावा आणि शहर कचरामुक्त व्हावे, यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती प्रकल्प व्यवस्थापक शिवदास देसाई यांनी दिली. मुख्याधिकारी सचिन देसाई यांनी या प्रकल्पाचे स्वागत करून विक्रेत्यांसह ग्राहकांनी या प्रकल्पाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी बाजारात याबाबत जागृती तसेच कापडी पिशव्यांचे वाटपही केले.

असा आहे प्रकल्प

या प्रकल्पांतर्गत काही विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. हे विद्यार्थी बाजारात फिरून विक्रेते आणि व्यापाऱ्यांमध्ये कचऱ्यासह ‘सिंगल यूज प्लास्टिक’विरोधात जागृती करणार आहेत. सिंगल यूज प्लास्टिकचे दुष्परिणामही पटवून देणार आहेत.

वीस दिवस हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाची कार्यवाही सुरू झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांची प्रकल्पांतर्गत निवड केली आहे ते शहरात फिरून जागृती करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT