P. S. Sreedharan Pillai | Goa News  Dainik Gomantak
गोवा

P. S. Sreedharan Pillai: गोमंतकीय शांत तेवढेच कष्टाळू

P. S. Sreedharan Pillai: राज्यपालांनी जाणून घेतल्या डिचोलीतील समस्या

दैनिक गोमन्तक

P. S. Sreedharan Pillai: गोव्यातील जनता शांत स्वभावाची तेवढीच कष्टाळू आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी काढले. डिचोली मतदारसंघाच्या दौऱ्यावेळी मुळगाव येथे आयोजित बैठकीत डिचोली मतदारसंघातील विविध पंचायतींचे सरपंच, पंचसदस्य, डिचोलीचे नगरसेवक आणि जनतेला संबोधित करताना राज्यपाल बोलत होते.

राजकारणाबरोबरच आपला डॉक्टरी पेशा प्रामाणिकपणे सांभाळतात. त्याबद्दल त्यांनी डिचोलीचे आमदार डॉ. शेट्ये यांची प्रशंसा केली. डी-लिला सभागृहात आयोजित केलेल्या या बैठकीस डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट

जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, नगराध्यक्ष कुंदन फळारी, लाटंबार्सेचे सरपंच पद्माकर मळीक, मुळगावची सरपंच तृप्ती गाड, मेणकूरेचे सरपंच गुरूदास परब, साळची सरपंच सावित्री घाडी आणि अडवलपालची सरपंच सुबत्ता सामंत,राज्यपालांचे सचिव मिहीर वर्धन, डिचोलीचे उपजिल्हाधिकारी रोहन कासकर, मामलेदार राजाराम परब आणि गट विकास अधिकारी श्रीकांत पेडणेकर उपस्थित होते.

तत्पूर्वी सकाळी राज्यपाल यांनी मेणकूरे गावाला भेट दिली. त्यांनी मेणकूरेतील विद्यार्थ्यांशी संवादही साधला. मेणकूरे येथेही राज्यपालांचे जंगी स्वागत करण्यात आले.

आर्थिक मदतीचे वाटप

डिचोलीत विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या मान्यवरांचा राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच डायलीसिस आणि कर्करोगग्रस्ताना मदतीचे धनादेश वितरीत करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. शुभा दिक्षित, प्रा. धारगळकर आणि प्रताप उगवेकर यांनी सूत्रसंचालन केले.

डिचोलीत उत्साह

राज्यपालांनी आपल्या दौऱ्यांत देवदर्शनाबरोबरच सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कर्करोगग्रस्नातांना धनादेश वितरण केले. त्याबाबत ग्रामस्थांत समाधान व्यक्त करण्यात आले. एकूणच या दौऱ्यावेळी ग्रामस्थात उत्साह दिसून आला.

गजनृत्याचा आस्वाद

बैठकस्थळी राज्यपाल पिल्लई यांचे आगमन होताच त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. राज्यपालांच्या पत्नी के. रिटा यांचा सन्मानही करण्यात आला. यावेळी धनगर बांधवांतर्फे गजनृत्य (चपय) सादर करण्यात आले. राज्यपालांनी या धनगर समाजाच्या लोकनृत्याचा आस्वाद घेतला.

आमदारांनी मांडल्या समस्या

आमदार डॉ. शेट्ये यांनी यावेळी मतदारसंघातील समस्या मांडल्या. खाणबंदीमुळे कामगारांवर संकट आले आहे. रोजगाक हीच प्रमुख समस्या सोडविण्यासाठी नियोजित औद्योगिक वसाहतीला लवकर चालना मिळण्याची गरजही आमदारांनी राज्यपालांकडे मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT