Goa : Fogging has been done in the Bicholim Panchayat area to control rain borne diseases on Friday, 15 July, 2021 Tukaram Sawant/Dainik Gomantak
गोवा

Goa: डिचोलीत डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण नाहीत

रोगराई टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांची गरज

Tukaram Sawant

डिचोली: पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू आदी साथीचे रोग फैलावण्याचा धोका असला, तरी डिचोलीत परिस्थिती सुस्थितीत आहे. सद्यःस्थितीत डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात डेंग्यू आणि मलेरियाचा एकही रुग्ण नाही. अशी माहिती आरोग्य केंद्राच्या सूत्रांकडून मिळाली आहे. महिन्यापूर्वी डिचोलीत डेंग्यूचे दोन रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे पावसाळ्यात डेंग्यू फैलावण्याचा धोका निर्माण झाला होता.


डिचोली शहरात पावसाळ्यातील आजार वा रोगराई नियंत्रणात असली, तरी मागील काही दिवसात डेंग्यूचे दोन संशयित रुग्ण आढळून आले होते. अशी माहिती सामाजिक आरोग्य केंद्रातून मिळाली आहे. दोन वर्षांपूर्वी डिचोली शहरातील बोर्डे परिसरात एका बांधकामाच्या ठिकाणी मलेरियाचा फैलाव झाला होता. परिसरातील जवळपास 35 जणांना मलेरियाची लागण झाली होती. यंदा अजूनतरी शहरात तसा धोका निर्माण झालेला नाही. मागील सात महिन्यात आतापर्यंत शहरात एकही मलेरियाचा रुग्ण आढळून आलेला नाही. अशी माहिती मिळाली आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना


डिचोली शहरात पावसाळ्यातील आजार टाळण्यासाठी डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. बांधकाम ठिकाणी निर्माण होणारी अस्वच्छता आणि मजुरांमुळे 'मलेरिया' आदी रोगराई फैलावण्याची अधिक संभावना असते. त्याची दखल घेत आरोग्य केंद्रातर्फे बांधकाम चालू असलेल्या जागांची पाहणी करण्यात येत आहे. मजुरांचीही तपासणी करण्यात येत आहे. स्वच्छता आदी नियम पाळण्याची सूचनाही बांधकाम कंत्राटदारांना करण्यात आली आहे. शहरात जंतूनाशक औषध फवारणी करण्यात येत आहे. अशी माहिती डिचोली आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ.मेधा साळकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT