Goa Accident Death Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: गोव्यात अपघातांचे सत्र थांबेना! 2 अपघातांत 2 तरुण ठार; डिचोलीत ‘हिट ॲण्ड रन’ची घटना

Goa Accident Death: डिचोलीत झालेल्या अपघातातील गणेश हा मूळ कर्नाटकमधील असून तो कृष्णानगर-डिचोली येथे राहत होता. तो व्यवसायाने इलेक्ट्रिशीयन होता.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: राज्यात रविवारी दोन ठिकाणी झालेल्या अपघातात दोन युवकांचा बळी गेला. डिचोली-दोडामार्ग रस्त्यावरील लाखेरे येथे तीन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकीचालक गणेश बिरादर (वय ३५) या युवकाचा मृत्यू झाला. तर हणजुणे येथील झालेल्या अपघातात जॅस्टर विन्सेंट रॉड्रीगीज (वय २७, केपे) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

डिचोलीत झालेल्या अपघातातील गणेश हा मूळ कर्नाटकमधील असून तो कृष्णानगर-डिचोली येथे राहत होता. तो व्यवसायाने इलेक्ट्रिशीयन होता. गणेश हा जीए-०४-पी-७७२१ या दुचाकीने कृष्णानगरच्या दिशेने जात होता.

लाखेरे येथील एका छोट्या वळणावर पोचताच समोरून येणाऱ्या जीए-०७-डी-५४९७ या क्रमांकाच्या कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेबरोबर नियंत्रण गेल्याने दुचाकीचालक गणेश हा रस्त्यावर पडला. त्याचवेळी मागाहून येणाऱ्या कंटेनरखाली तो चिरडला गेला.

गणेशला डिचोलीच्या सामाजिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघाताप्रकरणी घटनास्थळावरून कारसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर अपघातास कारणीभूत असल्याचा संशय असलेला आणि अपघात स्थळावरून पळ काढलेल्या कंटेनरचा पोलिस शोध घेत आहेत.

दुसरीकडे, जॅस्टर रॉड्रीगीज चालवत असलेल्या कारचा (क्र. जीए - ०३ - वाय - ९६६३) ताबा सुटल्याने त्याने आपली बाजू सोडून उजव्या बाजूने येत समोरील नारळाच्या झाडाला जोरदार धडक दिली.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातात जबर जखमी झालेल्या जॅस्टीनला म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, जॅस्टीनचा मृतदेह हणजुण पोलिसांनी सध्या उत्तर गोव्यातील जिल्हा इस्पितळात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून दिला असून त्याच्या जवळच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आल्याचे हणजुण पोलिस निरीक्षक सुरज गावस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT