Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : प्लास्टिकसह तंबाखूजन्य पदार्थ जप्त; पालिकेच्या सहकार्याने धडक मोहीम

Bicholim News : गुटखा खाण्याच्या तयारीत असताना एका राज्याबाहेरील मजुरालाही ताब्यात घेण्यात आले. या मोहिमेत पालिका तसेच मामलेदार कार्यालयातील अधिकारी आदी कर्मचाऱ्यांसह पोलिस अधिकारी आणि पोलिस कॉन्स्टेबल सहभागी झाले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली, मामलेदार कार्यालय आणि पालिकेने डिचोली बाजारात केलेल्या संयुक्त कारवाईत काही दुकानातून ''सिंगल युज'' प्लास्टिकसह तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. सिंगल युज प्लास्टिकसह तंबाखूजन्य पदार्थ बाळगणाऱ्या काही व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद करून त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली.

मामलेदार प्रवीण गावस आणि पालिकेचे मुख्याधिकारी सचिन देसाई यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या सहकार्याने आज (सोमवारी) सायंकाळी बाजारासह बसस्थानक परिसरात धडक कारवाई करुन काही दुकानातून ''सिंगल युज'' प्लास्टिकसह गुटखा, सिगारेट आदी तंबाखूजन्य पदार्थ मिळून हजारो रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.

गुटखा खाण्याच्या तयारीत असताना एका राज्याबाहेरील मजुरालाही ताब्यात घेण्यात आले. या मोहिमेत पालिका तसेच मामलेदार कार्यालयातील अधिकारी आदी कर्मचाऱ्यांसह पोलिस अधिकारी आणि पोलिस कॉन्स्टेबल सहभागी झाले होते.

आजच्या मोहिमेत नगरसेवक विजयकुमार नाटेकर, ॲड. रंजना वायंगणकर, मिनरल फॉउंडेशनच्या करिश्मा ताटे यांच्यासह सूर्यकांत देसाई, व्यंकटेश नाटेकर, उद्धव कशाळीकर, कॅजीटन वाझ, सुधीर आचार्य, राधिया देसाई, वनश्री चोडणकर आदी स्वच्छतादूत सहभागी झाले होते.डिचोली शहर प्लास्टिक आणि तंबाखूमुक्त व्हावे.

त्यासाठी ही धडक कारवाई हाती घेण्यात आली होती यापुढेही ही मोहीम चालूच राहणार आहे, अशी माहिती डिचोलीचे मामलेदार प्रवीण गावस आणि पालिकेचे मुख्याधिकारी सचिन देसाई यांनी दिली. बाजारातील दुकानदारांनी सिंगल युज प्लास्टिक आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद करुन शहर प्लास्टिक आणि तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही अधिकाऱ्यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT