Bicholim Court Building Dainik Gomantak
गोवा

Bicholim Court Building : डिचोलीतील कोर्टाच्या इमारतीला गळती; न्यायालयाला न्यायाची प्रतीक्षा

Bicholim Court Building : गेल्या वर्षी या इमारतीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाल्यानंतर या इमारतीची डागडुजी करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, यावर्षीचा दुसरा पावसाळा आला, तरी अद्याप इमारतीची डागडुजी केलेली नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Court Building :

डिचोली, शहरातील ‘ट्रिब्युनल’ अर्थात सध्याच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालय इमारतीला नवा साज सोडाच, यावर्षीही पावसाळ्यातील पाणी गळतीचे ग्रहण लागले आहे. पावसाचे पाणी आत झिरपत असल्याने यंदाही या इमारतीच्या छप्परावर प्लास्टिकचे आच्छादन घालण्याची वेळ आली आहे.

गेल्या वर्षी या इमारतीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाल्यानंतर या इमारतीची डागडुजी करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, यावर्षीचा दुसरा पावसाळा आला, तरी अद्याप इमारतीची डागडुजी केलेली नाही.

पोर्तुगीजकालीन आणि डिचोली शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेली सध्याची दिवाणी आणि फौजदारी न्यायालय इमारत पूर्वी ‘ट्रिब्युनल’ म्हणून ओळखण्यात येत होती. काही वर्षांपूर्वी या इमारतीची डागडुजी केली आहे. मार्च २००३ मध्ये या इमारतीला जोडून विस्तारीत इमारत बांधकाम केले आहे. मात्र, न्यायालयाची इमारत आता काहीशी कमकुवत झाली आहे.

या इमारतीच्या छपरातून पावसाचे पाणी झिरपते. परिणामी वकिलांसह न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या दोन वर्षांपासून या इमारतीच्या छप्परावर प्लास्टिकचे आच्छादन घालण्याची वेळ आली आहे.

विधानसभेतही गाजला मुद्दा

गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशनात आमदार प्रेमेंद्र शेट यांनी लक्षवेधी सूचना मांडताना या न्यायालय इमारतीचा मुद्दा उपस्थित केला होता. सरकारने या इमारतीची स्थैर्यता तपासावी. या इमारतीची नव्याने डागडुजी करावी. आवश्यकता भासल्यास नवी बांधावी, अशी मागणी आमदार शेट यांनी अधिवेशनात केली होती.

मोजमाप घेतले, पुढे काय? :

विधानसभेत डिचोलीतील न्यायालय इमारतीचा मुद्दा उपस्थित होताच, इमारतीची पाहणी करण्याचे आदेश तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. लागलीच अधिकाऱ्यांनी न्यायालय इमारतीची पाहणीही करून जागेचे मोजमाप घेतले होते. मात्र, त्यानंतर पुढे कोणत्याच हालचाली झाल्याचे दिसून आले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT