Bicholim News : डिचोली मतदारसंघात गावोगावी रस्त्यांचे जाळे विणून जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी दिली आहे.
शिरोडकरवाडा-मुळगाव येथे नवीन रस्त्याच्या कामाची बुधवारी (ता.१५) पायाभरणी केल्यानंतर डॉ. शेट्ये बोलत होते. विकासासाठी जनतेचे सहकार्य महत्त्वाचे असून, कोणतेही मतभेद न ठेवता विकासासाठी जनतेने पुढे यावे, असे आवाहनही आमदार डॉ. शेट्ये यांनी केले.
सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे सुमारे १३ लाख रुपये खर्च करून हा रस्ता बांधण्यात येणार आहे.
याप्रसंगी मुळगावच्या सरपंच तृप्ती गाड, उपसरपंच गजानन मांद्रेकर, पंच मानसी कवठणकर, सुहासिनी गोवेकर यांच्यासह पीडब्ल्यूडीची कार्यकारी अभियंता रश्मी मयेकर आणि कनिष्ठ अभियंता कशीष राणे उपस्थित होते. आमदार डॉ. शेट्ये यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाची पायाभरणी केली.
आमदारांची धडपड
शिरोडवाडा येथे रस्त्याच्या कामाची पायाभरणी झाल्याने सरपंच गाड यांनी समाधान व्यक्त करून आमदारांच्या पुढाकारातून मुळगावात विविध विकासकामे मार्गी लागल्याचे सांगितले.
प्रकाश आरोंदेकर यांनीही विकासकामांसाठी आमदारांची सतत धडपड असल्याचे नमूद केले. या पायाभरणी सोहळ्यावेळी ग्रामस्थांचीही उपस्थिती होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.