Bicholim: Citizens attack on Goa government asking for free water and hike in water bill  Dainik Gomantak
गोवा

मोफत पाण्याचे सरकारचे सोंगच, डिचोलीत नागरिक आक्रमक

सरकारकडून खरोखरच 16 हजार लिटर पाणी मोफत देण्यात येते की नुसती घोषणा करण्यात आली आहे. असा प्रश्न या नागरिकांनी उपस्थित केला आहे.

दैनिक गोमन्तक

मोफत सोडाच (Free Water), उलट पाण्याची बिले वाढीव येत असल्याची तक्रार करीत कुडणे आणि कारापूर येथील जागृत नागरिकांनी काल पाणी पुरवठा खात्याच्या डिचोली (Bicholim) येथील कार्यालयावर धडक दिली. यात काही महिलांचाही समावेश होता. सुरेश मळीक, नलिता नाईक आदी जागृत ग्राहक नागरिक यावेळी उपस्थित होते.या साऱ्यांनी वाढीव बिलांतील घोळ जाणून घेण्यासाठी पाणी पुरवठा कार्यालयात धडक दिली, त्यावेळी कार्यालयात जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते. बिलांतील घोळाबाबत संबंधित कर्मचारीही समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. अशी तक्रार या नागरिकांनी करून नाराजी व्यक्त केली आहे. (Citizens attack on Goa government asking for free water and hike in water bill)

फसव्या घोषणा नकोत

एकाबाजूने 16 हजार लिटरपर्यंत पाणी मोफत देण्याची सरकारने (Goa Government) घोषणा केली आहे. मात्र अलीकडेच देण्यात आलेली पाण्याची बिले आधीच्या बिलांपेक्षा कितीतरी पटीने वाढीव देण्यात आली आहेत. वाढीव बिलांतील तफावतही कळत नाही. पाणी पुरवठा खात्यातील कर्मचाऱ्यांनाही त्याचे स्पष्टीकरण देता येत नाही. त्यामुळे गोंधळ निर्माण होत असून, सरकारकडून खरोखरच 16 हजार लिटर पाणी मोफत देण्यात येते की नुसती घोषणा करण्यात आली आहे. असा प्रश्न या नागरिकांनी उपस्थित केला आहे. पाणी कमी वापरूनही आधीच्या तुलनेत यावेळी आपल्याला भरमसाठ बिल आले आहे. असे नलिता नाईक हिने सांगितले. सरकारने जनतेच्या भावनांशी खेळू नये. बिलांचा घोळ दूर करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा. अशी मागणी सुरेश माळीक, कृष्णा मळीक आणि इतरांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

SCROLL FOR NEXT