Bicholim children of Amthane tragedy getting helping hand Gomantak Digital Team
गोवा

Bicholim News : आमठाणे दुर्घटनेतील मुलांना मिळतोय मदतीचा हात

"मगरीने हिरावला तीन मुलांचा घास", या गोमंतकमधील वृत्तानंतर मदतीचा ओघ सुरु

dainik gomantak team

Bicholim News : आमठाणे दुर्घटनेत बळी पडलेल्या संगीता शिंगाडी या महिलेच्या मुलांना आता मदतीचा हात मिळू लागला आहे. ‘मगरीने हिरावला तीन मुलांचा घास!’ अशा आशयाचे वृत्त ता. 26 मेच्या दै. ‘गोमन्तक’मधून प्रसिद्ध झाल्यानंतर काही संस्था आणि दाते शिंगाडी कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठी पुढे येत आहेत.

गेल्या 20 मे रोजी आमठाणे धरणात मगरीने केलेल्या हल्ल्यात संगीता शिंगाडी या महिलेचा दुर्दैवी अंत झाला होता. तर तीन महिन्यांपूर्वी दुर्दैवी संगीता हिचे पती बाबलो शिंगाडी यांचा आकस्मिक मृत्यू झाला होता. यामुळे त्यांची मुले पोरकी झाली होती.

मगरीच्या हल्ल्यात बळी पडलेल्या संगीता शिंगाडी यांच्या पोरक्या झालेल्या मुलांची व्यथा प्रसिद्ध झाल्यानंतर मदत करण्यासाठी दाते पुढे येत आहेत, असे धनगर समाजोन्नती समितीचे डिचोली तालुका अध्यक्ष दिलीप वरक यांनी सांगितले. यासाठी त्यांनी दै. ‘गोमन्तक’ला धन्यवाद दिले आहेत. शिंगाडी कुटुंबाला मदत करणाऱ्या दात्यांचेही त्यांनी आभार मानले आहेत.

‘कॉस्मे बायोटेक’कडून मदत

मिनेझिस ग्रुपच्या ‘कॉस्मे बायोटेक’कडून मृत संगीता यांच्या मुलांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. कंपनीतर्फे प्रकल्प व्यवस्थापक संदेश कामत बांबोळकर यांनी कविता शिंगाडी आणि भगवान शिंगाडी यांच्याकडे आर्थिक मदतीचा धनादेश सुपुर्द केला. यावेळी कारापूर-सर्वणचे पंचसदस्य योगेश पेडणेकर, स्थानिक पंच आणि गोमंतक धनगर समाजोन्नती समितीचे डिचोली तालुका अध्यक्ष दिलीप वरक आदी उपस्थित होते.

आर्थिक पाठबळ वाढले

ओम साई साहाय्यता संस्थेकडूनही आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या या दुर्दैवी मुलांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. या मुलांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्वजण धडपडत आहेत. संस्थेचे मंदार अस्नोडकर आणि रोहन नाईक यांनी कविता हिच्याकडे आर्थिक मदतीचा धनादेश दिला. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्याकडून तसेच गोमंतक धनगर समाजोन्नती मंडळाकडूनही या मुलांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT