giving the check, MLA Dr. Chandrakant Shetye Dainik Gomantak
गोवा

Bicholim Burned Shop : डिचोलीतील जळितग्रस्त दुकानदारांना अर्थसहाय्य; आमदारांनी घेतला पुढाकार

ऐन दिवाळीत दिलासा ः मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी लाखाची मदत

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Burned Shop : डिचोली, डिचोली बाजारातील आग दुर्घटनेतील आपद्‍ग्रस्त दुकानदारांना ऐन दिवाळीत काहीसा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून आगीची मोठी झळ बसलेल्या पाच दुकानदारांना आर्थिक मदत मंजूर झाली आहे.

आज (गुरुवारी) सायंकाळी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी या दुकानदारांना आर्थिक मदतीचे धनादेश वितरीत केले. यावेळी नगरसेविका ॲड. अपर्णा फोगेरी, माजी उपगराध्यक्ष नारायण बेतकीकर आणि राजन कडकडे, डॉ. दिनेश आमोणकर तसेच एकनाथ लामगावकर आदी व्यापारी उपस्थित होते.

५ ऑक्टोबर रोजी रात्री डिचोलीतील जुन्या बाजारात भीषण आगीची दुर्घटना घडली होती. यात एकाच छताखाली असलेली तीन दुकाने पूर्णतः आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. तर अन्य दोन दुकानांचे मोठे नुकसान झाले होते. या दुर्घटनेत जवळपास १ कोटींच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते.

आमदार डॉ. शेट्ये यांनी आपद्ग्रस्त दुकानदारांची प्रत्यक्ष विचारपूस करून त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये आर्थिक साहाय्याचे धनादेश दिले. सरकार दरबारी प्रयत्न करुन आपत्कालीन योजनेंतर्गत मदत मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत, असा धीरही आमदार डॉ. शेट्ये यांनी नुकसानग्रस्त दुकानदारांना दिला.

‘ते’ दुकानदार अद्याप सावरलेले नाहीत !

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या प्रयत्नातून रामा बांदेकर, भूपेंद्र पोपकर, नारायण नाईक, यशवंत चणेकर आणि अशोक गोवेकर या पाच आपद्ग्रस्त दुकानदारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपये आर्थिक मदत मंजूर झाली आहे.

महिन्यापूर्वी घडलेल्या आग दुर्घटनेच्या धक्क्यातून दुकानदार अद्याप सावरलेले नाहीत. मात्र आता ऐन दिवाळीच्या तोंडावर मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळाल्याने दुकानदारांना दिलासा मिळाला आहे. आर्थिक मदत मिळाल्याबद्दल दुकानदारांनी स्थानिक आमदार डॉ. शेट्ये यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना धन्यवाद दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT