Amthane Dam Dainik Gomantak
गोवा

Amthane Dam: उत्तर गोव्यासाठी खुशखबर! ‘आमठाणे’ची स्थिती समाधानकारक! पाणीटंचाईची शक्यता कमी

Amthane Dam Water Storage: जानेवारी महिना संपण्याच्या वाटेवर असला, तरी डिचोलीतील ‘आमठाणे’ धरणात अजूनतरी समाधानकारक जलसाठा आहे.

Sameer Panditrao

Amthane Dam Storage Updates

डिचोली: जानेवारी महिना संपण्याच्या वाटेवर असला, तरी डिचोलीतील ‘आमठाणे’ धरणात अजूनतरी समाधानकारक जलसाठा आहे. सध्याचा जलसाठा पाहता, आणखी किमान दोन ते तीन महिने धरणातील जलसाठ्यावर मोठासा परिणाम होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनाही तसा आशावाद व्यक्त केला आहे. उत्तर गोव्याची तहान भागवणाऱ्या अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात आमठाणे धरणातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

मेणकूरे-धुमासे पंचायत क्षेत्रात येणाऱ्या आमठाणे धरणाचे कार्यक्षेत्र ५८२ हेक्टर मीटर एवढे आहे. तर पाण्याची पातळी ५२ मीटर एवढी आहे. गेल्या पावसाळ्यात हे धरण ''फूल्ल'' झाले होते. शनिवारपर्यंत (ता. १८) या धरणातील जलसाठ्याची पातळी ४८.५ मीटर एवढी होती. धरणातील सध्याचा जलसाठा पाहता पुढील किमान दोन ते तीन महिने काळजी करण्याचे कारण नाही. असे जलस्रोत खात्याचे म्हणणेआहे.

दरवर्षी साधारण फेब्रुवारी महिन्यात धरणातील जलसाठा कमी होत असतो. यंदा मात्र तशी स्थिती उद्‍भवणार नाही, असा अंदाज आहे. या धरणातील जलसाठ्यावर परिणाम जाणवू लागला, की जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी साळ बंधाऱ्यातून या प्रकल्पात पाणी सोडण्यात येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT