Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : १३ कोटी खर्चून डिचोलीत नवीन जलवाहिन्या : डॉ. चंद्रकांत शेट्ये

Bicholim News : पाण्‍याची समस्‍या सुटणार : हाऊसिंग बोर्ड येथे कामाचा शुभारंभ

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली, जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे आमदार या नात्याने माझे कर्तव्य आहे. डिचोली शहरातील पाण्‍याची समस्या सुटावी यासाठी जुनाट जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत.

या कामावर १३ कोटी खर्च करून विविध प्रभागांत नवीन जलवाहिन्या घालण्यात येतील, असे प्रतिपादन डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी केले.

हाऊसिंग बोर्ड-व्हाळशी येथे नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर शेट्ये बोलत होते. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, नगरसेवक विजयकुमार नाटेकर, दीपा शिरगावकर, ॲड. रंजना वायंगणकर, ॲड. अपर्णा फोगेरी, भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्‍‍वास गावकर, डॉ. कौस्तुभ पाटणेकर, पाणीपुरवठा खात्याचे कार्यकारी अभियंता तिवरेकर, साहाय्‍यक अभियंता पै काकोडे व ग्रामस्‍थ उपस्थित होते.

दरम्‍यान, हाऊसिंग बोर्ड परिसरात नवीन जलवाहिनी टाकण्यात येत असल्याबद्धल विजयकुमार नाटेकर आणि ग्रामस्‍थांनी समाधान व्यक्त केले. प्रा. प्रवीण सावंत यांनी आभार मानले.

‘अमृत मिशन’अंतर्गत काम; पाण्याची टाकी बांधणार

हाऊसिंग बोर्ड-व्हाळशी येथील जुनाट जलवाहिनी काढून केंद्र सरकारच्या ‘अमृत मिशन’ योजनेअंतर्गत नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या कामावर २.९ कोटी खर्च येणार आहे.

सदर काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील पाण्याची समस्या दूर होणार आहे. शिवाय हाऊसिंग बोर्ड भागात ३ कोटी खर्च करून पाण्याची टाकीही बांधण्यात येणार आहे. शहरातील बोर्डे भागातसुद्धा नवीन जलवाहिनी टाकण्यात येत आहे, अशी माहिती आमदार शेट्ये यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Prabhakar Panshikar: ..खऱ्या अर्थानं नायक कसा असावा? याचे उत्तम उदाहरण 'प्रभाकर पणशीकर'

Querim Ponda: सफर गोव्याची! लावण्यमयी निसर्गराजीने नटलेलं, सुरश्री केसरबाई केरकरांचा पदस्पर्श लाभलेलं 'फोंडा-केरी'

Ponda By Election: फोंड्यात भाजपला 'गटबाजी'ची भीती! उमेदवारीचा पेच सुटेना; युती असूनही मगोचे काही कार्यकर्ते काँग्रेससोबत

Goa Opinion: ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’ ऐकताना, हळूहळू नाहीसा होत चाललेला गोवा कानांना खुपत होता; राजकीय भक्ती आणि भवितव्य

अग्रलेख: वडिलांनी मुलाचा खून करून स्वत:चे जीवन संपविण्याइतपत काय घडले होते? आणखी किती बर्वे, म्हापसेकर?

SCROLL FOR NEXT