Actress Bhumi Pednekar Dainik Gomantak
गोवा

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Bhumi Pednekar: इफ्फीमध्ये मास्टर क्लास आणि संवाद या विभागात आज ‘महिलांची सुरक्षा आणि सिनेमा’ या सत्रात झालेल्या चर्चेमध्ये मूळ गोमंतकीय असलेली अभिनेत्री भूमी पेडणेकर हिचा समावेश होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Bhumi Pednekar At IFFI 2024 Master Class

पणजी: इफ्फीमध्ये मास्टर क्लास आणि संवाद या विभागात आज ‘महिलांची सुरक्षा आणि सिनेमा’ या सत्रात झालेल्या चर्चेमध्ये मूळ गोमंतकीय असलेली अभिनेत्री भूमी पेडणेकर हिचा समावेश होता. भूमीने स्वत:ची ओळख करून देताना जे सांगितले, ते एकप्रकारे गोमंतकीयांना अभिमानास्पद वाटेल.

भूमी म्हणाली की, मी गोमंतकीय कुटुंबात लहानाची मोठी झाल्यामुळे मला साहजिकच घरात एकप्रकारचे व्यक्तिगत स्वातंत्र्य होते. ज्यावेळी तिला घराबाहेरचे जीवन कळून आले, तेव्हा तिला महिलांच्या सभोवताली असलेल्या असुरक्षिततेची जाणीव झाली.

तिने उल्लेख केलेली तिची गोमंतकीय पार्श्‍वभूमी हेच सांगते की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची गोमंतकीयांची दृष्टी एकप्रकारे निकोप असते. आपल्या एका वाक्यातून भूमीने ते परिणामकारकपणे सांगितले.

सिनेमा तंत्रज्ञांवर कलाकारांचा दृढ विश्‍वास

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अली यांनीही त्यांचा मार्मिक अनुभव सांगितला. एका चित्रपटात करिना कपूर भूमिका करत होती. तिला रेल्वेच्या डब्यातील सर्वांत वरच्या बर्थवर झोपून संवाद बोलायचे होते. कॅमेरामनला अचानक वाटले की, तिच्यावर आणखी एक लाईट असायला हवी.

त्यामुळे त्याने त्यादृष्टीने तयारी करायला सुरुवात केली. इम्तियाज अली यांनी त्यामुळे जेव्हा करिनाला खाली उतरायला सांगितले, तेव्हा करिनाने आश्‍चर्य व्यक्त करून उतरायची गरज काय, असा प्रश्‍न अली यांना केला. ती तिथे झोपलेली असताना कॅमेरा साहाय्यक आणि लाईटमन यांना लाईटची व्यवस्था करण्यास तिची हरकत नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

SCROLL FOR NEXT