Goa To Bhopal गोव्यात मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या मध्य प्रदेशच्या भोपाळ येथील एकाचे आकस्मिक निधन झाले. गोव्यातून भोपाळ येथे तात्काळ मृतदेह कसा पोहचणार अशी चिंता त्याच्या घरच्यांना लागली होती. दरम्यान, स्थानिकांनी थेट तेथील आमदराची भेट घेतली आणि मृत व्यक्तीला विमानाने भोपाळला नेण्यात आले.
गो फर्स्ट कंपनीच्या विमानाने मृतदेह गोव्याहून भोपाळला नेण्यात आला आणि त्यानंतर रुग्णवाहिकेने तो दमोहहून बहेरियाला नेला.
मजुराच्या पश्चात त्याच्या घरी पत्नीसह पाच मुली आहेत. गोव्यात काम करत असताना अचानक पोटदुखीमुळे त्याचा मृत्यू झाला.
त्याच्या घरची परिस्थिती अतिशय हालाकिची असल्याने मृतदेह गावी कसा घेऊन यायाचा हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. दरम्यान, ग्रामस्थांनी फोनवरून त्यांची समस्या स्थानिक आमदार धर्मेंद्रसिंह लोधी यांच्यापर्यंत पोहोचवली.
आमदार लोधी यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी मृतदेह परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
"माझ्या मतदारसंघातील एका व्यक्तीचा गोव्यात मृत्यू झाला होता. गावकऱ्यांकडून याबाबत मला माहिती मिळाली, त्याचा मृतदेह मी विमानाने भोपाळला बोलावला. त्यानंतर येथून रुग्णवाहिका पाठवून मृतदेह गावात आणण्यात आला. नातेवाइकांनी त्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार केले. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना." अशी प्रतिक्रिया आमदार धर्मेंद्र सिंह लोधी यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात शोक पसरला असून, आमदार धर्मेंद्र सिंह लोधी यांच्या मनाच्या मोठेपणाचे देखील कौतुक केले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.