Bhoma Highway Dainik Gomantak
गोवा

Bhoma Bypass: ...तर पंचायतीला टाळे ठोका! बगलमार्ग प्रश्‍नावरुन ग्रामसभा पेटली; संतप्त भोमवासीयांचा 'महामार्ग नको'चा पुनरुच्चार

Bhoma Bypass Road: सरपंच सुनील नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत ग्रामस्थांनी आम्हाला गावातून चौपदरी महामार्ग नको बगलमार्ग हवा, असा पुनरुच्चार केला.

Sameer Panditrao

फोंडा: भोम बगल मार्गासंबंधी ग्रामस्थांचे म्हणणे पंचायतीमार्फत पाठवूनही सरकार जर ऐकून घ्यायला तयार नसेल, तर ग्रामपंचायत हवीच कशाला, असा सवाल करून पंचायतीला टाळे ठोका, अशी मागणी ग्रामस्थांनी आज ग्रामसभेत केली.

सरपंच सुनील नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत ग्रामस्थांनी आम्हाला गावातून चौपदरी महामार्ग नको बगलमार्ग हवा, असा पुनरुच्चार केला. यावेळी सातही पंचसदस्य उपस्थित होते. बगल मार्ग शेतीतून गेला तरी चालेल, असे ग्रामस्थ म्हणाले.

या ग्रामसभेत बगल मार्गावर चर्चा झाली. त्यात महिन्याभरापूर्वी केलेले गावातील रस्ता मोजमाप आम्हाला मान्य नाही हे मुख्यमंत्र्यांना कळवा आणि मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात ग्रामस्थांशी चर्चा करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी या ग्रामसभेत केली.गाव उदध्वस्त करून रस्ता नकोच, असा धोषा ग्रामस्थांनी लावला.

सरकारी कार्यक्रमांना फाटा द्या!

बगल मार्गासंबंधी ग्रामस्थांनी प्रश्न विचारल्यावर पंचायतीने सर्व ठराव सरकार-दरबारी पाठवले असल्याची माहिती दिली. मात्र, पाठवलेल्या ठरावांना सरकारकडून कोणतेच उत्तर आले नसल्याचे सांगितल्यावर पंचायत हवीच कशाला, असा सवाल ग्रामस्थांनी केला. पंचायतीच्या मताला किंमत नसेल तर सरकार पातळीवरील कार्यक्रमांना फाटा द्यावा, असे ग्रामस्थांनी सुचविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT