Bhau Kadam, Kushal Badrike, Shreya Bugade And Krishna Salkar Dainik Gomantak
गोवा

Chala Hawa Yeu Dya: भाऊ, कुशल, श्रेयाचा गोव्यात सन्मान; मिळाली अमूल्य भेट

शिगमोत्सवानिमित्त आयोजित चला हवा येऊ कार्यक्रम वास्को आणि पेडणे येथे आयोजित करण्यात आला होता.

Pramod Yadav

कॉमेडीचे बादशाह भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे शिगमोत्सवानिमित्त गोव्यात आहेत. गोव्यात त्यांनी ठिकठिकाणी साजऱ्या होणाऱ्या उत्सवात हजेरी लावली.

पेडणे येथे झालेल्या शिगमोत्सवात चला हवा येऊ द्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. त्यानंतर वास्को येथे देखील हा हास्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, या त्रिकुटाचा वास्कोत खास सन्मान करण्यात आला.

वास्कोचे आमदार कृष्णा दाजी साळकर यांनी भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे (Bhau Kadam, Kushal Badrike And Shreya Bugade)) यांचा खास सत्कार केला. गोमन्तकीयांच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून साळकर यांनी तिघांना कुणबी शाल आणि कुणबी साडी भेट म्हणून दिली.

नुकताच वास्को येथे गोव्याचा पारंपारिक शिगमोत्सव पार पडला. या उत्सवात प्रसिद्ध चला हवा येऊ द्या या कार्यक्रामाचे खास आयोजन करण्यात आले होते. वास्को येथील नागरिकांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर साळकर यांनी तिघांचा सन्मान केला.

वास्को येथे हा हास्य कार्यक्रमा सादर होण्यापूर्वी पेडणे येथे देखील तो पार पडला. पेडणे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान, चला हवा येऊ द्या हा कॉमेडी कार्यक्रम मागील आठ वर्षांपासून, महाराष्ट्रासह जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे आणि कार्यक्रमाचा होल अँड सोल निलेश साबळे घराघरात पोहोचले. महाराष्ट्रासह गोव्यात देखील या शोचे अनेक चाहते आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT