Arambol Resident Protest Dainik Gomantak
गोवा

Arambol News: हरमल भटवाडीत स्थानिक संतप्त! सेटलमेंट झोनमधील 'डोंगर' वाचवण्यासाठी एकजूट

Arambol Panchayat Zone: हरमल पंचायत क्षेत्रातील भटवाडी वाड्यावर अंदाजे ३.५ लाख चौमी. असलेला डोंगर सेटलमेंट झोनमध्ये रुपांतरित केल्याने भटवाडी वाड्यावरील सुमारे २०० संतप्त ग्रामस्थांनी जोरदार विरोध दर्शवला. सदर प्रश्‍न धसास लावण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

Local Residents Angry Over Hill Area Reclassification in Arambol

हरमल: हरमल पंचायत क्षेत्रातील भटवाडी वाड्यावर अंदाजे ३.५ लाख चौमी. असलेला डोंगर सेटलमेंट झोनमध्ये रुपांतरित केल्याने भटवाडी वाड्यावरील सुमारे २०० संतप्त ग्रामस्थांनी जोरदार विरोध दर्शवला. सदर प्रश्‍न धसास लावण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली.

ह्या सभेस तीन वाड्यावरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सभेस त्या वाड्यावरील माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी सरपंच रामचंद्र केरकर, पंच भिकाजी नाईक , पत्रकार चंद्रहास दाभोलकर व ॲड. प्रसाद शहापूरकर उपस्थित होते. सदर झोनबदल ही चुकीची दुरुस्ती नसून जाणूनबुजून केली आहे व त्यामुळे उद्देश स्पष्ट आहे. ह्या विषयाची धग माझ्या घरापर्यंत असल्याने याची तीव्रता समजून येते.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठाले प्रकल्प नको असल्यास,जनतेने प्रखर विरोध करणे आवश्यक असते.जमीन विक्री ते विकसित करण्याचे सोपस्कार नवीन मालकाकडे आहेत.मात्र तो कसा विकसित करतो,ह्याकडे जनतेचे लक्ष अस्यायला हवे.मात्र मुळात डोंगर जमीन रुपांतरण हा बेकायदा प्रकार असून पर्यावरणाची नासधूस व विध्वंस करून जनतेला विकास नको आहे,त्यासाठी सर्वांनी वज्रमूठ करून विरोध केला पाहिजे,असे ॲड प्रसाद शहापूरकर यांनी सांगितले.ह्यावेळी मांद्रे ,मोरजी,चोपडे आदी भागातील कित्येक प्रकरणाचा उहापोह केला,असे ॲड. शहापूरकर यांनी सांगितले.

...तर आम्हीच उपरे ठरू!

वया क्षेत्रात अंदाजे पन्नास हजार चौरस मीटर क्षेत्र असून,ह्यांना खूप धोका आहे,त्यात माझे घर आहे.पुढील वीस वर्षात नेमके आम्ही मागास,आदिवासी ठरू अशी स्थिती निर्माण झाल्यास,आम्ही उपरे ठरू अशी भीती आहे. पंचायत सदस्यांनी जनतेच्या पाठीशी ठाम राहिले पाहिजे, तेव्हा विनाशकारी प्रकल्प येणार नाहीत,असे मत माजी मुख्यमंत्री पार्सेकर यानी व्यक्त केले. दरम्यान, मुख्यमंत्री असताना,एक व्यक्ती आपल्याकडे आली, अनेक ऑफर्स दिल्या, मात्र ते पातक माथ्यावर नको म्हणून आपण धुडकावून लावल्याचे पार्सेकर यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

या जमीन रुपांतरण विषयात,आपण उतरल्यास,त्यास राजकीय अँगल मिळेल.आपण लोकांना भडकवतो आहे,अशी नाहक टीका होईल. लोक व विशेषतः नेते मंडळी,आपल्याला राजकारणाची खुमखुमी आहे, अशी टीका करतील. परिणामी आपल्या भूमिकेचा विपर्यास होईल. मात्र, ह्या भटवाडी वाड्यावरील रहिवाशी असल्याने सर्वतोपरी सहकार्य निश्चित असेल.
लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dattwadi Temple: 'प्रशासन चुकले, मामलेदारांविरोधात तक्रार करणार'! साखळीतील मूर्ती चोरी प्रकरणाला वेगळे वळण

Love Horoscope Today: रवि योग आणि नीचभंग राजयोगाचा 'या' राशींच्या लव्ह लाईफवर होणार परिणाम!

Taxi Aggregator: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर'बाबत फेरविचार करावा! पायलट संघटनेची मागणी; पारंपरिक व्यावसायिकांना फटका बसण्याची भीती

Yuri Alemao: 'राज्य सरकार बहुजनविरोधी, 2027 निवडणुकीत भाजपचा होणार दारूण पराभव'; LOP आलेमाव यांचा घणाघात

Shirgao: बळीराजा संकटात! शिरगावात भातशेती पाण्याखाली; पावसाच्या तडाख्याने रोपे मातीमोल

SCROLL FOR NEXT