Gomantak Bhandari Samaj Dainik Gomantak
गोवा

Bhandari Community In Goa: 'जाणकारांनी पुढे येण्याची गरज'! भंडारी कार्यकारिणी निवडणूकीवरून नाईक यांचे मोठे वक्तव्य

Gomantak Bhandari Samaj: राज्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा हा समाज दिशाहीन ठरला असल्याने जाणकारांनी पुढे येण्याची गरज असल्याचे भंडारी समाजाचे एक कार्यकर्ते तथा ओबीसी महासंघाचे अध्यक्ष मधू नाईक यांनी फोंड्यातील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Gomantak Bhandari Samaj Election

फोंडा: राज्यातील समाजकारण, राजकारण आणि एकंदरीत सर्वच आघाड्यांवर महत्त्वाची भूमिका बजावणारा भंडारी समाज हा गोव्यातील लोकसंख्येत ३३ टक्के आहे. मात्र राज्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा हा समाज दिशाहीन ठरला असल्याने जाणकारांनी पुढे येण्याची गरज असल्याचे भंडारी समाजाचे एक कार्यकर्ते तथा ओबीसी महासंघाचे अध्यक्ष मधू नाईक यांनी फोंड्यातील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

या समाजाच्या उत्कर्षासाठी आपण स्वतः भंडारी समाज केंद्रीय कार्यकारिणी निवडणुकीत उतरलो असल्याचे मधू नाईक यांनी जाहीर केले. येत्या १७ तारखेला ही निवडणूक होणार आहे. या पत्रकार परिषदेला नौबत वैद्य, शिवाजी नाईक व दामोदर नाडर आदी उपस्थित होते.

नाईक म्हणाले, भंडारी समाज हा राज्याच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे, मात्र समाजाला अनेक समस्या सतावत आहेत. समाजातील सर्व बांधवांनी एकजुटीने कार्य केल्यास भंडारी समाजाचा उत्कर्ष होणे शक्य आहे, त्यामुळे एक संधी घ्यावी, यासाठी आपण भंडारी समाजाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलो आहे.

भंडारी समाजाच्या केंद्रीय कार्यकारिणीत प्रतिनिधित्व मिळाल्यास सरकार दरबारी मागण्या पुढे नेण्यास उपयुक्त ठरणार आहे. त्यात भंडारी समाजासाठी राज्य सरकारकडून फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना करणे, समाजातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून दोन लाख चौरस मीटर जमीन संपादन करून शिक्षण संकुल उभारणे, आयपीएस तसेच इतर उच्च परीक्षांबाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

विद्यार्थ्‍यांना अर्थसाहाय्य

भंडारी समाजाची जनगणना करण्याबरोबरच समाजातील पारंपरिक व्यावसायिकांना महामंडळाकडून आर्थिक मदत उपलब्ध करून देणे, भंडारी समाजातील विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची सोय करणे, एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या भंडारी समाज विद्यार्थ्यांच्या पहिल्या वर्षासाठी फी देणे तसेच उच्च शिक्षणासाठी शंभर शिष्यवृत्त्या प्रदान करणे, भंडारी समाज प्रतिनिधी नोंदणीसाठी पाचशे रुपयावरून शंभर रुपयावर फी करणे, तसेच निवडणुकीसाठीचे मतदान तालुकावार करण्याचा संकल्पही आपण केला असल्याचे मधू नाईक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

खेळणं म्हणून एक वर्षाच्या मुलाने किंग कोब्राचा घेतला चावा; सापाचा मृत्यू, बाळ सुरक्षित

चप्पलने बडवेन! दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामया आणि शिवकुमार यांचे OSD भिडले; सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

SCROLL FOR NEXT