Damodar Bhajani Saptah Dainik Gomantak
गोवा

Damodar Bhajani Saptah: भजनी सप्ताहासाठी वास्को नगरी सजली; दामोदर मंदिरात झगमगाट

स्वातंत्रपथ, अंतर्गत रस्त्यावर भरणार फेरी

दैनिक गोमन्तक

Damodar Bhajani Saptah At Vasco: राज्यातील प्रसिद्ध श्री दामोदर भजनी सप्ताहासाठी वास्को नगरी सज्ज झाली असून मंगळवार २२ रोजी दुपारी १२ वाजता श्री दामोदर चरणी श्रीफळ अर्पण करून अखंड 24 तासांच्या श्री दामोदर भजनी सप्ताहाला प्रारंभ होणार आहे.

गेली तीन वर्षे कोरोना महामारीमुळे होऊ न शकलेल्या वास्कोतील दामोदर भजन सप्ताह यंदा सार्वजनिकरित्या साजरा करण्यासाठी वास्कोवासीय सज्ज झाले आहेत. यानिमित्ताने दामोदर मंदिर रंगरंगोटी व आकर्षक विद्युत रोषणाईने सजविले आहे.

श्री दामोदर भजन सप्ताह बाजारकार उत्सव समितीने विष्णु गारोडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठका घेऊन भजनी सप्ताहात कोणतीच कमतरता भासणार नाही याची दखल घेतली आहे.

त्यानंतर कायदा सुव्यवस्थेविषयी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय, निमसरकारी अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. त्यावेळी त्यांना योग्य त्या सूचना दिल्या गेल्या.

एकंदरीत यंदाचा सप्ताह सार्वजनिकरित्या साजरा करण्याचे ठरवण्यात आले. त्यासाठी पालिकेनेही शहरात फेरी घालण्यासाठी फेरीवाल्यांना परवाने देण्याचे काम पूर्ण केल्यानंतर येथील स्वातंत्रपथ व अंतर्गत रस्त्यावर फेरी थाटण्याचे काम पूर्ण केले.

गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण शहरात फेरी दुकाने थाटताना दिसली. तसेच घरोघरी लगबगही दिसली.

सर्व पारांचे व गायन मैफलींचे आयोजन यंदा होणार आहे. वास्कोतील श्री दामोदर भजनीला सप्ताहाला १२४ वर्षांची परंपरा लाभलेली आहे. गोवा तसेच शेजारच्या राज्यांमध्ये हा सप्ताह उत्सव प्रसिध्द आहे.

कोरोना महामारीमुळे २०२० व २०२१ मध्ये गर्दीवर कडक निर्बंध लागू झाल्याने हा सप्ताह केवळ धार्मिक विधी पुरताच मर्यादित राहिला होता. मागच्या वर्षी या उत्सवावर निर्बंध नव्हते. मात्र, कोरोनाची सुप्त भीती होती. तरीही पालिकेने फेरीवाल्यांना फेरी थाटण्यासाठी संमती दिली होती.

मंगळवारी दुपारी १२ वाजता जोशी कुटुंबियानंतर्फे श्री दामोदर चरणी श्रीफळ अर्पण केल्यानंतर दामोदर भजनी सप्ताहाल प्रारंभ होणार आहे. श्री चरणी श्रीफळ अर्पण केल्यानंतर मनोहर शिवोलकर (मांडेकर) यांचे सुपूत्र अशोक मांद्रेकर यांच्या ‘जय जय राम कृष्ण हरी’च्या गजराने अखंड २४ तासांच्या भजनाला सुरवात होणार आहे.

दुपारी २ ते २.५० वाजेपर्यंत बेलाबाय भजनी मंडळ, २.५० ते ३.४० पर्यंत त्रिमूर्ती भजनी मंडळ, नंतर श्रीराम भजनी मंडळ (३.४० ते ४.३०), कलादीप भजनी मंडळ (४.३० ते ५.२०), श्री लक्ष्मीनारायण भजनी मंडळ (५.२० ते ६:१०), त्रिशुल खाप्रेश्वर भजनी मंडळ (६.१० ते ७.००)

मुशेले कला मंडळ (७ ते ७.५०), शिवप्रासादीक भजनी मंडळ (७.५० ते ८.४०), साईबाबा भजनी मंडळ (७.५० ते ९.३०), गजानन भजनी मंडळ (९.३० ते १०.२०) ॐकार संगीत भजनी मंडळ (१०.२० ते ११.१०), संतोषी माता भजनी मंडळ ११.१० ते १२ वाजेपर्यत भजन सादर करणार आहेत.

२३ ऑगस्ट रोजी रात्री स्वरब्रम्ह भजनी मंडळ (१२ ते ३.३०), शनैश्वर भजनी मंडळ (३.३० ते ४.००), शिवसमर्थ भजनी मंडळ (४.०० ते ५.१०) राष्ट्रोळी भजनी मंडळ (५.१० ते ६), ओरुले दत्तावाडी भजनी मंडळ (६ ते ६.५०), मधूकर मांजरेकर भजनी मंडळ (६.५० ते ७.४०)

राजाराम भजनी मंडळ (७.४० ते ८.३०), ओम श्री विष्णू कला सांस्कृतिक मंडळ (८.३० ते ९.२०), शारदा संगीत विद्यालय (९.२० ते १०.१०), गणपती पंचायतन भजनी मंडळ (१०.१० ले ११), श्री हनुमान भजनी मंडळ (११ ते ११.५०) आदी भजनी मंडळांचा साखळी पद्धतीने भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

नंतर अशोक मांद्रेकर व स्थानिक कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. यादरम्यान बालगोपाळांतर्फे दिंडीसहीत श्रीफळ खारीवाडा येथे समुद्रात विर्सजीत करण्यासाठी मिरवणूक निघेल. नंतर बाळगोपाळ नाचत परत श्री दामोदर मंदिरात येऊन ‘गोपाळकाला गोड झाला’ असे म्हणत या गोपाळकाल्याने अखंड २४ तासांच्या श्री दामोदर भजनी सप्ताहाची सांगता होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT