Goa Weather Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: सावधान! हवामानाचा मूड बदलतोय

गोमन्तक डिजिटल टीम

जगभरात होणाऱ्या हवामान बदलाबाबत अनेकदा चर्चा होतात. मात्र, आताच या बदलांकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करत योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे. गोव्यासारख्या लहानशा राज्यात देखील सातत्याने हवामानात अनियमित बदल घडत आहेत.

अवकाळी पाऊस, ऐन हिवाळ्यात उष्म्याची लाट अशा घटना घडत आहेत. याचा परिणाम आरोग्यावर होतो. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यायला हवी, असे आवाहन आरोग्य तज्ज्ञ, वेधशाळेच्या वैज्ञानिकांनी केले आहे.

गोव्याचा उन्हाळ्यात सर्वसाधारण तापमान हे 34 अंश असते. परंतु यंदा मार्चच्या सुरवातीलाच तापमानाचा पारा 39 अंश सेल्सिअसवर पोहोचला. राज्यात गतवर्षी मे मध्ये पहिल्यांदा उष्णतेची लाट घोषित करण्यात आली. मात्र, यंदा हिवाळ्यात फेब्रुवारीमध्ये दुसऱ्यांदा उष्णतेची लाट घोषित करण्यात आली.

राज्यात कमाल तापमानाच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे, यावरून आपण राज्यातील तापमानाच्या स्थितीचा अंदाज लावू शकतो. त्यामुळे सरकारने पर्यावरणीयदृष्ट्या तसेच नागरिकांनीही योग्य पावले उचलली नाहीत, तर येणाऱ्या पिढ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.

पावसाचीही अनियमितता

गतवर्षी राज्यात सरासरीच्या तुलनेत पावसात 9 टक्के घट झाली. तसेच एकाच दिवशी उच्चांकी 6 इंचांहून अधिक पाऊस बरसण्याच्या घटना घडल्या. या अनियमिततेमुळे पर्जन्यवृष्टी होण्याच्या दिवसांत घट होत आहे. 2020 साली राज्यात सर्वसामान्य पावसाच्या अनुषंगाने 41 टक्के अधिक पाऊस बरसला. यावरून पावसातील अनियमिततेकडेही गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

यंदा फेब्रुवारी महिन्यातच तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पाऊस, तापमान, वातावरण यात सातत्याने बदल दिसून येत आहेत. यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी स्वीकारून हवामानाच्या सुधारणेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

नागरिकांनी प्रवासासाठी अधिकाधिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, जेणेकरून वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी होईल. स्थानिक उत्पादने, खाद्यपदार्थांना प्राधान्य देणे गरजेचे आहे.

- डॉ. एम. आर. रमेशकुमार, निवृत्त एमआयओ शास्त्रज्ञ

हवामान बदल ही जागतिक समस्या आहे. परंतु निश्‍चितपणे मागील दहा वर्षांतील राज्यातील तापमानाचा अहवाल पाहिला तर सर्वसामान्य तापमानात वाढ होत आहे. आपल्या कृषिप्रधान देशाची अर्थव्यवस्था देखील मान्सूनवर अवलंबून आहे.

त्यामुळे प्रत्येक नागरिकाने नैसर्गिक संसाधनांचा वापर शक्य तेवढा कमी करावा. वीज, पाणी वापर कमी होणे गरजेचे आहे. तसेच हरित ऊर्जेचा वापर वाढविणे गरजेचे आहे.

- एम. राहुल, वैज्ञानिक, गोवा वेधशाळा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

Quelossim: ही तर नौटंकी! केळशीची बदनामी केल्याचा व्हेंझी यांच्‍यावर सरपंचांचा आरोप

Sunburn Festival 2024: धार्मिक स्थळी 'असले' कार्यक्रम नकोच! 'सनबर्न' साठीच्या सभेनंतर ग्रामस्थ ठरवणार दिशा

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

SCROLL FOR NEXT