Goa Hit and Run Case: गोव्यात 2023 पासून रस्ते अपघातांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर गोवा सरकार आणि वाहतूक विभाग आधीच सतर्क होऊन कार्यरत आहे. वाहनचालकांचा निष्काळजीपणा हेच या अपघातांमागचे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. असाच एक प्रकार समोर आला आहे.
म्हापसामध्ये ही घटना घडली आहे. एके ठिकाणी ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणारा डिलिव्हरी बॉय पर्रा येथे आपल्या ग्राहकाकडे जात असताना त्याला एका भरधाव कारने जोरदार धडक दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला.
या धडकेत डिलिव्हरी बॉय जखमी झाला असून त्याला म्हापसा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलिस त्या कारचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, असाच एक प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. जलवाहिनी फुटल्याने सध्या माडेल-थिवी येथे महामार्गावर साबांखाच्या अधिकाऱ्यांकडून दुरुस्ती सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास गुरुवार मध्यरात्रीपर्यंत वेळ लागू शकतो.
त्यामुळे बार्देशात शुक्रवारपर्यंत मर्यादित पाणीपुरवठा असेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अशातच, बुधवारी सायं. 7.30 वा.च्या सुमारास एका भरधाव टाटा एसने घटनास्थळी बॅरिकेड्सला धडक दिली. यात कनिष्ठ अभियंता तनय कांदोळकर यांना टाटा एसची धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.