Goa Corona Updates  Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: सावधान! राज्यात कोरोनाने एकाचा मृत्यू; कोरोनाचे शंभरहून अधिक नवीन रूग्ण

सक्रीय रूग्णसंख्या 500 च्या दिशेने... सावधगिरी बाळगण्याची गरज

Akshay Nirmale

Goa Corona Update: गोव्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वेगाने वाढ होत चालली आहे. त्यातच राज्यासाठी धक्कादायक अशी एक बातमी आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 4013 वर स्थिर राहिली होती.

तथापि, राज्यात गेल्या चोविस तासात एका कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना मृत्युंची संख्या 4014 झाली आहे.

कोरोना तपासण्यांची संख्या जसजशी वाढेल तसतशी नवीन कोरोना रूग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात गोव्यात एकूण 108 नवे कोरोना रूग्ण आढळून आले.या नव्या रूग्णांमुळे राज्यातील सक्रीय म्हणजे उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांच्या संख्येचा आकडा आता साडेचारशेचा टप्पा ओलांडून 453 वर पोहचला आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात आढळलेल्या 108 नवीन कोरोना रूग्णांपैकी 7 रूग्णांना रूग्णालयात दाखल केले आहे तर उर्वरीत 101 बाधितांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

गेल्या 24 तासांमध्ये एकूण 16 रूग्ण कोरोनामुक्त झाले तर एकूण 959 चाचण्या करण्यात आल्या. राज्यात कोरोनामुक्तीचा दर 98.28 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे एक मृत्यू झालेला नाही. राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे 4014 मृत्यू झाले आहेत.

राज्यात एकूण 21 लाख 61 हजार 079 चाचण्या झाल्या आहेत. तर एकूण 2 लाख 59 हजार 813 कोरोनारूग्ण आढळून आले होते. त्यापैकी 2 लाख 55 हजार 346 रूग्ण बरे झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT