Illegal Hotels in Goa: Dainik Gomantak
गोवा

Illegal Hotels in Goa: सावधान! गोव्यात हॉटेल बूक करताय? राज्यात 300 हून अधिक हॉटेल्स बेकायदेशीर...

पर्यटन विभागाच्या हेल्पलाईनची होऊ शकते मदत

Akshay Nirmale

Illegal Hotels in Goa: गोवा हे देशी पर्यटकांचे आवडीचे डेस्टिनेशन आहे. येथे देशभरातून कोट्यवधी पर्यटक दरवर्षी येत असतात. तथापि, गोव्यातील पर्यटनाच्या नावाखाली अनेकांची फसवणूक होत असल्याचे प्रकारही उघडकीस येतात. त्यामुळे गोवा सरकार वारंवार पर्यटकांसाठी विविध माहिती जारी करत असते.

समोर आलेल्या नव्या माहितीनुसार राज्यात 300 हून अधिक बेकायदा हॉटेल्स सुरू आहेत. खुद्द पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनीच ही माहिती विधानसभेतील उत्तरात दिली आहे.

त्यामुळे गोव्यात येण्याआधी, येथे राहण्यासाठी हॉटेल बूक करण्याआधी आपण बेकायदा हॉटेलमध्ये तर नोंदणी करत नाही ना, याची काळजी पर्यटकांनी घेण्याची गरज आहे. अन्यथा त्यांची फसवणूक होऊन त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

मंत्री खंवटे यांच्या माहितीनुसार राज्यातील उत्तर गोवा जिल्ह्यातील 188 तर दक्षिण गोव्यातील 113 हॉटेल्सची अशा एकूण 301 हॉटेल्सची पर्यटन विभागाकडे नोंदणीच नाहीय. त्यामुळे ही हॉटेल्स तांत्रिकदृष्ट्या बेकायदेशीर आहेत. नोंदणी नसल्याने या हॉटेल्सना नोटिस बजावण्यात आली आहे.

दरम्यान, पर्यटन विभागाने टाईम सॉफ्टवेयर आणले आहे. त्याद्वारे हॉटेलमधील सर्व माहिती मिळवली जाते. त्यात पर्यटकांचा ओघ, पर्यटकांनी गोव्यात घालवलेला वेळ, त्यांचे नागरीकत्व आणि इतर गोष्टीही त्यातून कळू शकतात.

पर्यटकांनी अशा बेकायदेशीर हॉटेल्समध्ये जर बुकिंग केले तर त्यांना विनाकारण त्रासाला सामोरे जावे लागू शकते. पर्यटनासाठी म्हणून यायचे आणि इथे वेगळ्याच अडचणीत अडकायचे, असे होऊ नये म्हणून पर्यटकांनीच आता याबाबत सतकर्ता बाळगण्याची गरज आहे.

दरम्यान, हॉटेलच्या नावाने बनावट वेबसाईट्सद्वारे पर्यटकांची लूट होत असल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला होता. अशा रितीने फसवणूक होऊ नये म्हणून गोवा पर्यटन विभागाच्या 1364 या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून खात्री करून घेता येऊ शकते. किंवा गोवा पर्यटन विभागाच्या वेबसाईट्सवर विविध अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक आहेत, त्यांच्याशीही संपर्क साधता येऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT