Betki Primary Health Centre Dainik Gomantak
गोवा

Betki Health Centre Issues: बेतकी प्राथमिक आरोग्य केंद्र ‘आयसीयू’मध्‍ये; आवश्‍‍यक सुविधांचा अभाव

Betki Primary Health Centre: डॉक्टर्स व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: प्रियोळ मतदारसंघातले बेतकी प्राथमिक आरोग्य केंद्र समस्याग्रस्त बनले आहे. डॉक्टर्स व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. उपचारांसाठी आलेल्या रुग्णांना तासन्तास ताटकळत बसावे लागते. सर्दी, ताप, खोकला या दैनंदिन आजारांसोबत अपघातांच्या घटनांमध्येही दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असताना डॉक्टरांची कमतरता मोठी अडचण ठरतेय.

बेतकी, तिवरे वरगाव, भोम-आडकोण, वळवई, वेरे-वाघुर्मे, केरी या पंचायत क्षेत्रातील लोकांसाठी बेतकी आरोग्य केंद्र अतिशय महत्वाचे आहे. गोव्याची माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांच्‍या काळातील ह्या आरोग्य केंद्राची जुनी इमारतीची जागाही आता अपुरी पडतेय. ह्या सगळ्यामुळे केंद्रात आलेले रुग्ण आणि सुरक्षा रक्षकांमधील बाचाबाचीच्या घटना आता नित्याच्याच बनल्या आहेत.

लाखो रुपये खर्चून पायाभरणी इव्हेंट; मात्र...

लाखो रुपये खर्चून बेतकी आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचा पायाभरणी सोहळा पार पडला होता. २०२२च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी घाईगडबडीत हा पायाभरणी इव्हेंट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व स्थानिक आमदार तथा मंत्री गोविंद गावडेंच्या उपस्थितीत पार पडला होता. मात्र, हा पायाभरणी समारंभ पार पडून आता तीन वर्षे होत आली; तथापि नव्या इमारतीसाठी एक दगडही घालण्यात आलेला नाही. उलट ह्या पायाभरणी समारंभाचा फलक खितपत पडलेला आहे.

रात्रीच्यावेळी एकच डॉक्टर

बेतकी प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्यावेळी फक्त एकच डॉक्टर असल्याने केंद्रात रुग्णांच्या रांगा लागलेल्या पहायला मिळत आहेत. उपलब्ध डॉक्टरही काहीच करू शकत नाहीत. ओपीडीतील रुग्णांची तपासणी सुरू असताना अचानक इमर्जन्सी वा अपघात रुग्ण आल्यास डॉक्टरांना धावाधाव करावी लागते. एका डॉक्टरला दोनशेपेक्षा जास्त रुग्ण हाताळावे लागत असल्याने डॉक्टरांवरही मोठा ताण येतोय. त्याखेरीज आरोग्य केंद्रावरील डॉक्टरना वळवई, सावईवेरे व अन्य उप आरोग्य केंद्रांवरही सेवा द्यावी लागत असल्याने त्याचा परिणाम प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण हाताळणीवर होत आहे.

पूर्वीची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या यात खूप फरक पडला आहे. आता माशेलचे पूर्ण शहरीकरण झाले आहे. बेतकी आरोग्य केंद्राचे ‘अपग्रेडेशन’ अत्यावश्यक आहे. नव्या इमारतीचा प्रस्ताव सरकार दरबारी रखडल्याचे कळतेय. तो जर मार्गी लागला तर नव्या इमारतीच्या माध्यमातून आरोग्याच्या आधुनिक साधन-सुविधांचा लाभ लोकांना मिळण्यास मदत होईल.
पांडुरंग नाईक, बेतकी
बेतकी आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय उपचारांसाठी येतात. ह्या परप्रांतीय रुग्णांसाठी वेगळी रांग व त्यांची माहिती आरोग्य केंद्राने ठेवणे गरजेचे आहे. एकतर आरोग्य केंद्राची जागा अपुरी पडतेय, त्यात परप्रांतीय रुग्णांची संख्या जास्त होत असल्याने स्थानिक हे खाजगी डॉक्टरांचा पर्याय निवडत आहेत.
मिलिंद फडते, तामसुली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

SCROLL FOR NEXT