खांडोळा: कोविड (covid19) काळात बेतकी (Betaki) आरोग्य केंद्राचे उत्तम कार्य असून या भागासाठी बेतकी येथे सुसज्ज आरोग्य केंद्र (Betaki health centre) उभारण्यात येणार असून स्वातंत्र्यदिनी (Independence Day) पायाभरणी करण्यात येईल, असे प्रतिपादन विश्वजित राणे (Health Minister) यांनी माशेल (Mashel) येथे बेतकी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या गौरवप्रसंगी केले (Frontline workers). व्यासपीठावर जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले, सिद्धेश नाईक, सरपंच दिलीप नाईक, उन्नती नाईक, ज्योनीता डिकॉस्ता, प्रभारी सरपंच नीलकंठ नाईक, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जुझे डिसा, संसर्ग प्रतिकारक अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर व डॉ. ब्रॅँडा पिंटो उपस्थित होत्या. आरोग्य खात्यातर्फे बेतकी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स, परिचारिका व अन्य विविध कर्मचारी वर्गाचा आरोग्यमंत्री विश्वजित राणे व कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे (Art & culture Minister) यांच्या हस्ते कदंब (Kadama hall) महामंडळाच्या सभागृहात गौरव करण्यात आला.
दिवस रात्र आपल्या जिवाची तसेच कुटुंबाची पर्वा न करता रक्षक बनून सर्वांनी या कोविड महामारीच्या काळात न डगमगता रुग्णांची, कोविडबाधितांचे प्राण वाचवण्यासाठी प्रामाणिकपणे निरंतर सेवा केली. त्यासाठी सर्व डॉक्टर्स, परिचारिका व अन्य विविध कर्मचारी वर्ग कौतुकास पात्र ठरत आहेत. म्हणूनच गोवा सरकारतर्फे सर्वांचा गौरव करण्यात येत आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले. मंत्री गावडे म्हणाले, माशेल पंचक्रोशीतील नागरिकांना आरोग्यविषयक चांगली सुविधा देण्यासाठी बेतकीत अंदाजे २२ कोटी रुपये खर्चून सर्व सोयीनियुक्त असे सुसज्ज आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. याचा लाभ येथील जनतेला होणार आहे. आरोग्य, शिक्षण, कृषी उपक्रमावर आपले शासन भर देत असून आपल्या प्रियोळ मतदारसंघात या तीनही घटकांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. यावेळी डॉ. ब्रॅंडा पिंटो यांनी स्वागत केले तर विस्तार अधिकारी राजू घाटवळ यांनी सूत्रसंचालन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.