Bengaluru To Madgaon Vande Bharat Express: Dainik Gomantak
गोवा

बंगळूरू ते मडगाव प्रवास होणार अधिक वेगवान! शुक्रवारपासून 'वंदे भारत एक्स्प्रेस'ची सेवा सुरू; पंतप्रधान आणि रेल्वेमंत्री दाखवणार हिरवा झेंडा

Bengaluru To Madgaon Vande Bharat Express: बंगळूरू ते गोवा दरम्यान शुक्रवारपासून (ता. १३) ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ धावणार आहे

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: बंगळूरू ते गोवा दरम्यान शुक्रवारपासून (ता. १३) ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ धावणार आहे. बंगळूरू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंगळूरू येथे रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव या रेल्वेला झेंडा दाखवून रवाना करतील.

या नव्या गाडीला पश्चिम घाटातील रेल्वेमार्गावर प्राधान्य देण्यात येणार असल्याने विद्यमान १३ रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. नव्या वंदे भारतमधून दररोज सुमारे १,१०० प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे.

बंगळूरूमधील यशवंतपूर ते गोव्यातील मडगावदरम्यान धावणारी ही वंदे भारत देशातील सर्वांत संथ वंदे भारत चेअरकार सेवा ठरण्याची शक्यता आहे. सुमारे ६७० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी या गाडीला १२ ते १३ तासांपेक्षा अधिक वेळ लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या मार्गावरील सकलेशपूर ते सुब्रह्मण्य रोड हा पश्चिम घाटातील सुमारे ५५ किलोमीटरचा पट्टा सर्वांत आव्हानात्मक आहे. या भागात डोंगराळ प्रदेश, तीव्र चढ-उतार, वळणे, बोगदे आणि घनदाट जंगल आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव या संपूर्ण पट्ट्यात रेल्वेगाड्यांचा कमाल वेग ताशी ३० किलोमीटरपर्यंत मर्यादित आहे.

या वंदे भारत सेवेला कर्नाटक आणि गोव्यातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. यशवंतपूरहून सुटल्यानंतर गाडी श्रवणबेळगोळ, हासन, सकलेशपूर, सुब्रह्मण्य रोड, कबाका पुत्तूर, मंगळुरू जंक्शन, उडुपी, कुंदापूर, मूकांबिका रोड बिंदूर, मुरुडेश्वर, गोकर्ण रोड आणि कारवार या स्थानकांवर थांबेल. मडगाव हे या गाडीचे अंतिम स्थानक असेल. मडगावकडे जाताना थोकूर येथेही अतिरिक्त थांबा असेल.

बुधवारी सेवा बंद

रेल्वे मंत्रालयाने या सेवेसाठी २६६५५ आणि २६६५६ हे गाडी क्रमांक निश्चित केले आहेत. प्रस्तावित वेळापत्रकानुसार यशवंतपूरहून सकाळी ७.३५ वाजता गाडी सुटणार असून बुधवारी सेवा बंद राहील.

परतीच्या प्रवासात मडगावहून सकाळी ८.२० वाजता गाडी सुटून रात्री ९.१५ वाजता यशवंतपूरला पोहोचेल. गुरुवारी परतीची सेवा नसेल. या नव्या सेवेमुळे सध्या सुरू असलेली मडगाव-मंगळुरू वंदे भारत सेवा बंद करण्याचीही योजना आहे. २९ नोव्हेंबरपासून या विद्यमान सेवेसाठी आरक्षण स्वीकारणे बंद करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Woman Assault: म्हापसा, काणकोणनंतर आता कुडचडे हादरले! महिलेला डोंगराळ भागात नेऊन लैंगिक अत्याचार; संशयित पोलिसांच्या ताब्यात

EPFO खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी! आता घरबसल्या दुरुस्त करा पीएफ खात्यातील चुका; कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्ता 60 टक्क्यांवरून 63 टक्क्यांवर, जुलैपासून मिळणार लाभ

RGP Dispute: निवडणूक आयोगाचे पत्र 'आरजी'च्या जुन्याच पत्त्यावर, गुरुवारच्या बैठकीत परब गटाचा पदाधिकारी राहणार उपस्थित; वाद चिघळणार

Mapusa Assault Case: म्‍हापसा प्रकरणातील नराधम अखेर पणजीत जेरबंद; 5 दिवसांची पोलिस कोठडी; तांत्रिक पुरावे, गुप्त माहितीच्या आधारे कारवाई

SCROLL FOR NEXT