Goa Theft Dainik Gomantak
गोवा

Goa Theft: चाकूचा धाक दाखवून बाणावलीत डॉक्टरला  लुटले, दीड लाखांचा ऐवज पळविला

Margao Theft: मडगावातील एका नामांकित डॉक्टरला बाणावली येथे त्याच्या विला मध्ये चाकूचा धाक दाखवून लुबाडण्याची खळबळजनक घटना सोमवारी (ता.६) रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: मडगावातील एका नामांकित डॉक्टरला बाणावली येथे त्याच्या विला मध्ये चाकूचा धाक दाखवून लुबाडण्याची खळबळजनक घटना सोमवारी (ता.६) रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली. चोरट्याने, त्यांच्या गाळ्यातील  सोनसाखळी व पाकीट हिसकावून नेऊन अंदाजे दीड लाखांचा ऐवज पळविला.

या प्रकरणी या डॉक्टरने कोलवा पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदविली आहे. पोलिसांनी भारतीय  न्याय संहितेच्या कलम ३२९(३),११५(२) ३५१ (३),३०९ (४) व १२७ (२) या कलमाखाली अनोळखी इसमावर गुन्हा नोंद केला आहे. 

पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निखिल खाजनेकर पुढील तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या चोरट्याने ‘विला’मध्ये शिरला. दरवाजा उघडा होता. आत डॉक्टर होते. त्याने चाकूचा धाक दाखविला व ढकलून खाली पाडले  व त्यांना लुटून, कारची चावी , घराची चावी व अन्य वस्तू पळविल्या. 

कोलवा पोलिसांशी संपर्क साधला असता, तक्रारदाराने  संशयिताचे वर्णन केले असून , सीसीटीव्ही  कॅमेऱ्याच्या  माध्यमातून सध्या  पुढील तपास चालू आहे. तूर्त तपास प्राथमिक स्तरावर असल्याने अधिक माहिती देणे पोलिसांनी टाळले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT