Drumstick | Vegetables Rate in Goa | Vegetables Price in Goa | Drumstick benefits  Dainik Gomantak
गोवा

Vegetables Rate in Goa: आरोग्यासाठी फायदेशीर असणारी शेवग्याची शेंग खातेय भाव!

Vegetables Rate in Goa: बेळगाव बाजारातून गोव्यात या शेंगा दोन प्रकारच्या येतात.

दैनिक गोमन्तक

Vegetables Rate in Goa: आरोग्यदायी असणारी शेवग्याची शेंग सध्या भाजीपाला मार्केटमध्ये चांगलाच भाऊ खाऊन जात आहे. दोनशे रुपये किलो दराने तिची विक्री होत असून, चार नगांसाठी 50 रुपये मोजावे लागत आहेत. विशेषतः कर्नाटक बाजारात येणारी शेवग्याच्या शेंगांचा घाऊक बाजार महाराष्ट्राप्रमाणे वधारलेला असल्याने त्याचा परिणाम गोव्यातील विक्री दरावर होत आहे.

सध्या महाराष्ट्रात मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांत शेवग्याची शेंग गुजरातमधून आयात होत आहे. इतर ठिकाणच्या शहरात मागील आठवड्यात शेवग्याच्या शेंगांचा क्विंटलचा दर सात ते बारा हजार रुपयांपर्यंत राहिल्याची माहिती समोर आली आहे.

बेळगाव बाजारातून गोव्यात या शेंगा दोन प्रकारच्या येतात. त्यात अधिक कालावधीच्या जाडसर आणि कवळ्‍या शेंगांचा सहभाग आहे. जाड आणि साधारण अडीच ते तीन फूट लांबीच्या शेंगांना मागणी आहे. परंतु कवळ्या आणि कमी जाडीच्या शेंगांनाही दर चांगला मिळत आहे.

शेती फायदेशीर

शेवग्याच्या शेंगांचे आरोग्यदायी महत्त्व वाढत असल्याने खरे तर येथील शेतकऱ्यांना हे पीक घेणे फायदेशीर ठरू शकते. ज्या प्रमाणात शेवग्याच्या शेंगांची शेती आवश्‍यक आहे, तेवढ्या प्रमाणात होत नाही. शेवग्याची स्थानिक पातळीवर शेती झाल्यास या शेंगा मार्केटमध्ये सहज उपलब्ध होऊ शकतात. ज्या दराने शेंगा खरेदी कराव्या लागतात, ते पाहता हे पीक नक्कीच फायदेशीर आहे, हे नक्की.

आरोग्यदायी शेवगा

‘क' जीवनसत्त्व असलेली शेवग्याची शेंग नियमित आहारात असल्यास शारीरिक थकवा येत नाही. अपचन, त्याशिवाय डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी ही शेंग फायदेशीर असते. त्याशिवाय शेवग्याचा पालाही भाजी म्हणून वापरतात. अलीकडे शेवग्याच्या शेंगांचे फायदे लोकांच्या लक्षात येत असल्याने त्यांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT