Aaditya Thackeray  Dainik Gomantak
गोवा

Aaditya Thackeray: 'गोव्यातून इराकला बीफ पाठवलं जातंय आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार?; आदित्य ठाकरेंनी भाजपला डिवचलं

Goa Beef Export: भाजप केवळ निवडणुकी पुरतं हिदुत्व वापरतं आणि नंतर हिंदुंना फेकून देतं, अशी टीका ठाकरे यांनी केली.

Pramod Yadav

मुंबई: माजी मंत्री आणि विद्यमान शिवसेना (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपला हिंदुत्वाच्या मुद्यावरुन डिवचलं आहे. गोव्यात असणाऱ्या मीट कॉम्पलेक्समधून इराकला गोमांस पाठवलं जात असल्याची माहिती देत, हे आम्हांला हिंदुत्व शिकवणार का? अशा शब्दात ठाकरे यांनी भाजपवर शरसंधान साधले.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे बोलत होते. भाजपची ही दुटप्पी भूमिका जगजाहीर आहे. गोव्यात असणाऱ्या मीट कॉम्पलेक्समधून मध्य आशियातील देशांना गोमांस पाठवले जात आहे. इराकला गोमांस पाठवण्यात आले आणि भाजप आम्हाला हिंदुत्व शिकवणार का?, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी भाजपला डिवचलं. भाजप केवळ निवडणुकी पुरतं हिदुत्व वापरतं आणि नंतर हिंदुंना फेकून देतं, अशी टीका ठाकरे यांनी केली.

गोव्यातून नुकेतच इराकला २८.५ टन गोमांस जहाजाद्वारे निर्यात करण्यात आले. गोव्यात कत्तलीसाठी गुरांची कमतरता असताना शेजारी कर्नाटक आणि महाराष्ट्रातून जनावरं आयात करुन गोमांस निर्यात केली जात आहे. गोवा मीट कॉम्पलेक्समधून गोमांस निर्यात केली जात आहे. मीट कॉम्पलेक्समधून बाहरीन, कुवेत, संयुक्त अरब आमिरात, इराक यासारख्या देशातून गोमांसाची मागणी केली जात आहे. यावरुनच आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

दरम्यान, एकनाथ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांनी गणपती मिरवणुकीत बंदूक रोखली होती. पोलिस स्थानकात जाऊन त्यांनी गोळी चालवली. तत्कालिन गृहमंत्री गोळी कोणी चालवली हे आम्हाला माहिती नाही, असं सांगतात. हिंदुवर बंदूक रोखणाऱ्या सरवणकरांवर युएपीएसारखा कायदा लागू करायला हवा होता. स्वत:ला हिंदू सांगणाऱ्या भाजप सरकारने याच सरवणकरांना सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष केलं, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT