beck is blocked by Mopa Airport  Dainik Gomantak
गोवा

मोपा विमानतळामुळे आटला 'हाळीचा झरा‘ !

पाणी संकट: एकूण 43 नैसर्गिक झरे बुजल्याचा परिणाम

दैनिक गोमन्तक

पेडणे: मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सभोवतालीच्या गावात एकूण 43 पाण्याचे झरे होते. मोपा विमानतळाच्या रनवेपासूनच्या काही अंतरावरच हाळी या गावात एक नैसर्गिक झरा होता. परंतु तो झरा आता आटून गेला आहे. हा झरा मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे आटला असावा, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. या झऱ्याची वोलसाण फक्त आता शिल्लक आहे.

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शेजारील जवळच्या गावात हा झरा वाहत होता. सभोवतालच्या झऱ्यांचे जतन करून विमानतळाचे काम झाले पाहिजे, अशी अट सर्वोच्च न्यायालयाने विमानतळाला हिरवा कंदील देताना घातली होती. मोपा विमानतळाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करून पर्यावरणाची हानी केल्यामुळे हा झरा बंद झाल्याचे स्थानिक भास्कर नारुलकर यांनी सांगितले.

या झऱ्यावर पूर्ण हाळी हा गाव यापूर्वी अवलंबून होता. या झऱ्याचे पाणी पिण्यासाठी व इतर कामांसाठी पूर्ण गाव वापरत असे. नळ आल्यानंतर झऱ्याचे पाणी वापरायचे लोकांनी कमी केले. परंतु तो झरा वाहत तसाच होता, गावातील युवक कधीतरी वनभोजन करण्यासाठी त्या झऱ्यावर जात असत. परंतु तो झरा आता पूर्णपणे आटला असल्याचे भास्कर नारुलकर यांनी सांगितले.

बेसुमार वृक्षतोडीचा परिणाम

या झऱ्याच्या पाण्याने गावात यापूर्वी कोणतेही आजार पसरल्याचे ऐकिवात नसल्याचे त्यांनी सांगितले. या नैसर्गिक झऱ्याचा प्रवाह आता संपुष्टात आला आहे. याचे कारण म्हणजे मोपा विमानतळामुळे झालेली पर्यावरणाची हानी व बेसुमार वृक्षतोड हेच असू शकते असे मत भास्कर नारुलकर यांचे आहे. सरकार मार्फत हा झरा का आटला याचा शोध लावायला हवा जेणेकरून परिसरातील इतर झरे सुरक्षित राहतील.

आरोग्यदायी महत्त्व

यापूर्वी जलस्त्रोत खात्यातर्फे जवळपास तीन लाख रुपये खर्च करून हा झरा जतन करण्यासाठी बांधकाम केले होते. हाळी गावचे या झऱ्याशी भावनिक संबंध जुळलेले आहेत. होळीच्या दिवसात सर्वजण याच झऱ्यावर अंघोळ करण्यासाठी जातात ही त्यांची भावनिक परंपरा आहे. या झऱ्याच्या पाण्याने आंघोळ केल्यानंतर शरीराला बाहेरून असलेले काही आजार दूर होतात असाही समज स्थानिकांमध्ये आहे.

सांडपाणी सोडणार कोठे?

मिळालेल्या माहितीनुसार, मोपा विमानतळावर अजूनही सांडपाणी सोडण्याकरिता कोणतीही काळजीपूर्वक उपाय योजना आखलेली नाही. त्यामुळे जर सांडपाणी या झऱ्यातून वाहू लागले तर त्याचे विपरीत परिणाम परिसरातील जनतेला भोगावे लागतील, अशी भीती भास्कर नारुलकर यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT