Goa Ganesh Chaturthi 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Ganesh Chaturthi 2023: माटोळीतून साकारली आई लईराई देवीची देखणी प्रतिकृती

Goa Ganesh Chaturthi 2023: 350 वनस्पतींचा वापर : गावठणच्या दत्ता नाईक कुटुंबीयांची किमया

दैनिक गोमन्तक

Goa Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सव काळात गणपतीसमोर आकर्षक माटोळी सजावटीतून इतरांना आनंद देण्याचे काम गावठण - प्रियोळ येथील नाईक कुटुंबीयांकडून गेली अनेक वर्षे चालले आहे. या आकर्षक माटोळी सादरीकरणातून नाईक कुटुंबाला राज्य सरकारच्या कला व संस्कृती खात्याच्या माटोळी सजावट स्पर्धेत आतापर्यंत अनेक बक्षिसेही प्राप्त झाली असून यंदा तर त्यांनी शिरगावच्या आई लईराई देवीची प्रतिकृती माटोळीतून सुरेख साकारली आहे.

गावठण - प्रियोळ येथील दत्ता नाईक यांच्या घरी यंदा गणपतीसमोर आई लईराईदेवीचे चित्र साकारणारी माटोळी बांधण्यात आली आहे. या माटोळीसाठी साडेतीनशेपेक्षा जास्त नैसर्गिक वनस्पती, फळांचा वापर करण्यात आला आहे. यासंबंधीची माहिती देताना दत्ता नाईक म्हणाले की, माटोळी साकारण्यासाठी लागणारे जिन्नस आम्ही चोर्ला, अनमोड तसेच पेडणे ते काणकोणपर्यंतच्या रानातून गोळा करतो.

काही वस्तू स्थानिक भागातूनही उपलब्ध केली जातात. याकामी आमचे सगळे कुटुंबीय तसेच मित्र व आप्तेष्टांचे सहकार्य लाभते. माटोळीसाठी वस्तू गोळा करणे पासून ते गणपतीसमोर माटोळी बांधण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभत असल्याने आकर्षक माटोळी गणेश भक्तांसाठी उपलब्ध करणे शक्य होते, असे दत्ता नाईक म्हणाले.

यंदा आई लईराईची प्रतिकृती माटोळीत साकारण्यात आली आहे. शिरगावचा आई लईराई देवीचा जत्रोत्सव फार प्रसिद्ध असून अनेक लोक देवीचे भक्त आहेत, त्यामुळे देवीची प्रतिकृती साकारताना अतिशय आनंद झाला, असे नाईक कुटुंबियांनी सांगितले. माटोळीसाठी चार खांब उभारण्यात आले आहेत, त्यासाठी नारळांचा वापर करण्यात आला आहे. याकामी ७८९ नारळ वापरण्यात आले आहेत. चतुर्थीच्या आधी चार दिवसांपूर्वी ही सारी तयारी करावी लागते, असे दत्ता नाईक म्हणाले.

अनेक पुरस्कार...

राज्य सरकारच्या कला व संस्कृती खात्यातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या माटोळी सजावट स्पर्धेत आतापर्यंत नाईक कुटुंबाला चार प्रथम पुरस्कार मिळाले आहेत. इतर उत्तेजनार्थ बक्षिसेही या स्पर्धेत नाईक कुटुंबाने पटकावली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Grabbing Case: गोव्यातील भू-माफियांना ईडीचा दणका! बनावट कागदपत्रे बनवून जमीन हडपणाऱ्यांची 6.27 कोटींची मालमत्ता जप्त

Viral Video: रील बनवणाऱ्या मॉडेलचा तमाशा! भररस्त्यात एकाला झोडपलं, सोशल मीडियावर उठली टीकेची झोड; काय घडलं नेमकं?

Iran US Israel War: ''इराण कधीही सरेंडर करु शकतो'', डोनाल्ड ट्रम्प यांचा G7 बैठकीत मोठा दावा; मध्यपूर्वेतील युद्धाला नवं वळण

Gyanesh Kumar: केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध विरोधकांचं 'महाभियोग' अस्त्र; 193 खासदारांच्या स्वाक्षरीसह संसदेत नोटीस दाखल

Panaji Municipal Election Result 2026: पणजी महानगरपालिकेवर भाजप-बाबूश पॅनेलचं निर्विवाद वर्चस्व, उत्पल पर्रीकरांच्या पॅनेलचा धुव्वा; विजयी उमेदवारांची संपूर्ण लिस्ट

SCROLL FOR NEXT